Goa Congress: माजी ‘साबांखा’ मंत्र्यांची, अधिकाऱ्यांची चौकशी करा! काँग्रेसची दक्षता आयोगाकडे मागणी

Goa Congress Party: कथित बेकायदशीर नोकरभरती प्रकरण
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress Party: सार्वजनिक बांधकाम खात्यात अभियंत्यांच्या 350 पदांच्या झालेल्या कथित बेकायदा नोकरभरती प्रकरणात माजी मंत्री नीलेश काब्राल आणि दीपक पाऊसकर यांच्यासह या खात्यातील अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसतर्फे शुक्रवारी दक्षता आयोगाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, या तक्रारींसाठी ‘गोमन्तक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या कथित बेकायदेशीर नोकरभरती प्रकरणाशी निगडीत वृत्तांचा दुजोराही पक्षाने दिलेला आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास खलप यांच्या सहीनिशी हा तक्रार अर्ज दक्षता आयोगाकडे सादर केला आहे. या तक्रार अर्जाची प्रत मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि राज्याचे मुख्य सचिव यांनाही पाठवल्या आहेत.

Goa Congress
Goa Unseasonal Rain: इफ्फी, तुळशी विवाहाच्या धामधूमीत 'अवकाळी'ची एंट्री; वरुणराजाच्या आगमनाने गोवेकरांची धांदल

या मागणीविषयी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांच्या रिक्त पदांसाठी माजी मंत्री दीपक पाऊसकर यांच्या काळात परीक्षा झाली आणि त्यावेळी भाजपच्याच मंत्र्याने या नोकरभरतीत लाखो रुपये घेतल्याचा आरोप झाला.

त्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याचे ठरले होते. परंतु या कथित घोटाळ्यामुळेच पाऊसकर यांना विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली होती. पाऊसकर यांच्या कार्यकाळात झालेल्या कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली, परंतु त्या समितीने दिलेला चौकशी अहवाल सार्वजनिक झाला नाही.

Goa Congress
Goa Illegal Liquor Seized: अवैध दारू तस्करीचा पर्दाफाश; 'कर्नाटक उत्पादन शुल्क'कडून 25 लाखांचा दारूसाठा जप्त

नव्या सरकारात सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार स्वीकारणारे नीलेश काब्राल यांच्या काळात या नोकरभरतीत पारदर्शकता येईल, असे वाटले होते. परंतु तसे झाले नाही, उलट तो चौकशी अहवालही बाहेर आला नाही.

परीक्षेच्या निकालासाठी पाच महिन्यांचा काढण्यात आलेला वेळ, आपल्या मर्जीतले उमेदवार घुसवण्यासाठीच होता, असा संशय घेण्यास नक्कीच वाव असल्याचे पाटकर म्हणाले.

‘गोमन्तक’च्या वृत्तांचा दाखला

प्रदेश काँग्रेसने दिलेल्या लेखी तक्रारीत ‘गोमन्तक’ने गेल्या पाच दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम खात्यातील कथित अभियंत्यांच्या बेकायदा नोकरभरतीप्रकरणावर प्रकाश टाकला.

कथित नोकरभरतीचे वृत्त प्रसिद्ध होताच, साबांखा खात्याच्या मंत्र्यांनी दिल्लीवरून परतताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

गेल्या पाच दिवसांपासून या कथित नोकरभरती प्रकरणाच्या मागील घोटाळ्याचा ‘गोमन्तक’ने पर्दाफाश करण्याचा प्रयत्न केला आहे. या वृत्तांचा हवाला देत काँग्रेसने अखेर दक्षता आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com