‘दामोदर’साठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर; मडगाव नगराध्यक्षपदाची निवडणूक

रेस्ट हाऊसमध्ये भाजप नगरसेवकांसह बैठक
Madgaon Mayor Election
Madgaon Mayor ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : नगराध्यक्ष निवडण्यासाठी एक दिवस बाकी असताना मडगाव येथे राजकीय हालचालींना वेग आला आहे. दिगंबर कामत गटाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांना निवडून आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कंबर कसली आहे. तर घनःश्याम शिरोडकर यांच्या बाजूने गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी ताकद पणाला लावली आहे.

Madgaon Mayor Election
Goa Congress : आमदार राखता येत नाहीत, खुर्ची सोडा! ; कार्यकर्ते संतापले

भाजपचे सदानंद नाईक यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांना उद्या शुक्रवारी आपला अर्ज मागे घेण्याची सूचना करण्यात आली आहे. घनःश्याम शिरोडकर हे भाजपतून चार मते आपल्याकडे वळवू शकले तर त्यांची सरशी होऊ शकते. आज घनःश्याम यांनी निर्वाचन अधिकारी श्रीनेत कोठवाळे यांना पत्राद्वारे निवडणुक निःपक्षपातीपणे घ्यावी अशी विनंती केली आहे.

मतदान गुप्त रितीने व्हावे यासाठी कक्षात कुणाला मोबाईल किंवा कॅमेरा आणण्यास बंदी घालावी अशी मागणी केली. मडगाव येथे पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्याला 13पेक्षा जास्त नगरसेवकांचा पाठिंबा आहे, असा दावा केला. त्यामुळेच एकतर उद्याची बैठकच रद्द व्हावी किंवा मतदान दाखवून करावे यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप केला. मतदान केलेल्या नगरसेवकांनी आपण मारलेल्या मताचा मोबाईलवर फोटो काढून तो नेत्यांना पाठवावा, असा संदेश दिल्याची माहिती मिळाली आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.

‘दामोदर यांना मतदान करा’

पालिकेत भाजपचे 9, गोवा फॉरवर्डचे 8, दिगंबर कामत यांचे 7 आणि एक अपक्ष असे नगरसेवक आहेत. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी दामोदर यांच्या बाजूने मतदान करावे, अशी मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत मोती डोंगरावरील रेस्ट हाऊसमध्ये मुख्यमंत्र्यांची भाजप आणि कामत गटाच्या नगरसेवकांबरोबर बैठक सुरू होती. यावेळी बाबू आजगावकर, नरेंद्र सावईकर, दामू नाईक हजर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com