Goa Congress: भाजप प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला

तिरंगा जागृती कार्यक्रमात राष्ट्रीय ध्वज पकडला उलटा - काँग्रेस
National Flag| India
National Flag| IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: लोकांमध्ये तिरंगा जागृती करण्यापूर्वी स्वतः राष्ट्रध्वजाचा मान राखायला शिकले पाहिजे. परंतु, भाजपशी संबंधित संस्थेचे तिरंग्याबद्दल काय मत आहे, हे सर्वांना ठाऊक आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी जाहीर कार्यक्रमात तिरंगा उलटा धरून राष्ट्रीय ध्वजाचा अपमान केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

(Goa Congress criticizes BJP state president Sadanand Shet over the national flag)

National Flag| India
Goa Elections | पंचायत निवडणुकीचे मतदान सुरू | Panchayat Election Voting begins | Gomantak TV

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि इतरांसह भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा कसा अपमान केला आहे, हे समाज माध्यमांवर अनेक चित्रफितींतून समोर आले आहे. 11 आणि 12 ऑगस्ट रोजी तिरंगा जागृती करण्यापूर्वी भाजपचे तानावडे यांनी तिरंगा कसा धरायचा हे शिकून घ्यावे, असा टोला काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी हाणला आहे.

National Flag| India
Goa Panchayat Election: मुरगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी 72.35 टक्के मतदान

तानावडे यांनी जाहीर केलेल्या दोन दिवसीय ‘तिरंगा जागृती’ कार्यक्रमावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, पणजीकर यांनी भाजपच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा केलेला अनादर दाखवणारा व्हिडिओ सुरू केला. भाजपचे कार्यकर्ते आता राष्ट्रध्वज वापरून राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही पणजीकर यांनी यावेळी केला.

हा तर प्रसिद्धीसाठी स्टंट

हर घर जल, अखंड वीज, नोकरी, गरजूंना वेळेवर आर्थिक साहाय्य, आरोग्य सेवा, इंटरनेट कनेक्शन, शिक्षण, सरकारी खात्यात शून्य भ्रष्टाचार, यावर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. ‘हर घर तिरंगा’ हे भाजपचे मिशन म्हणजे केवळ प्रसिद्धीचा स्टंट आहे, अशी टीकाही पणजीकर यांनी केली.

भाजप नेत्यांकडूनच घरचा आहेर

गरीब लोकांना त्यांचे रेशन घेताना तिरंगा खरेदी करण्यास भाग पाडले जाताना भाजपचेच नेते वरुण गांधी यांनी समाज माध्यमांवर टाकलेला व्हिडिओ धक्कादायक आहे. खोटी देशभक्ती आणि जुमला राष्ट्रवाद दाखवून राजकीय फायदा मिळवण्यासाठी भाजप सरकार आणि पक्षाचे पदाधिकारी दादागिरी करत आहेत, असेही पणजीकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com