राज्यातील 186 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत मुरगाव तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी 72.35 टक्के मतदान झाले. यात सर्वाधिक 78.12 टक्के मतदान बोगमाळो पंचायतीसाठी झाले. तर सर्वात कमी मतदान कासवली ग्रामपंचायतीसाठी 66 टक्के मतदान झाले.
आज मुरगाव तालुक्यातील सात पंचायतीसाठी एकूण 72.35 टक्के मतदान झाले. सकाळी 08 वाजता मतदान ला सुरुवात झाल्यानंतर संत गतीने मतदारांची गर्दी दिसून आली. नंतर दुपारच्या सत्रात मतदार मतदानासाठी बाहेर आले. सकाळी 11:30 वाजेपर्यंत मतदारांनी चांगली हजेरी लावली. मतदान केंद्रावर येणाऱ्या मतदारांची उमेदवार शेवटच्या क्षणी समजून काढण्याचा प्रयत्न करत होते. एकूण मतदान शांतताप्रिय वातावरणात संपन्न झाले. कोणतेही अघटीत घटना घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तथापि काही उमेदवारांनी मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप प्रत्यारोप झाला. हा अपवाद वगळता मतदान संत गतीने व शांततेत झाले. दुपारी बारा वाजेपर्यंत वेलसांव (40.03 टक्के), चिकोळणा बोगमाळो (53.70 टक्के), केळशी (51.09 टक्के), चिखली (34.39 टक्के), कुठ्ठाळी (41.74 टक्के), कासावली (33.41 टक्के) व सांकवळ (34.22 टक्के) मतदान झाले होते.
मुरगाव तालुक्यात सर्वाधिक मतदान ग्रामपंचायत साठी 78.12 टक्के मतदान झाले. 1,769 मतदार असलेल्या या पंचायत क्षेत्रातील 619 पुरुष व 663 महिला मिळून 1,382 मतदारांनी मतदान केले. तर सर्वात कमी मतदान कासवली ग्रामपंचायती साठी 66 टक्के एवढे मतदान झाले. या पंचायत क्षेत्रात 4,726 मतदार असून पैकी 1,328 पुरुष व 1,761 महिला मतदार मिळून 3,119 मतदारांनी मतदान केले.
त्या पाठोपाठ चिखली ग्रामपंचायत साठी 69.89 टक्के मतदान झाले. यात 3172 पुरुष व 3162 महिला मतदार मिळून 6334 मतदारांनी मतदान केले. या पंचायत क्षेत्राची एकूण मतदार संख्या 9195 एवढी आहे. केळशी ग्रामपंचायत साठी 66.85 मतदान झाले यात 676 पुरुष व 974 महिला मिळून 1650 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या पंचायत क्षेत्राची मतदार संख्या एकूण 2147 एवढी आहे.
कुठ्ठाळी ग्रामपंचायत साठी 72.48 टक्के मतदान झाले. या मतदारसंघात 4859 मतदार संख्या असून पैकी 1556 पुरुष व एक हजार 966 महिला मिळून 3522 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. वेलसांव ग्रामपंचायत साठी 67.04 टक्के मतदान झाले. यात 1008 पुरुष तर 1124 महिला मतदार मिळवून 2132 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या पंचायत क्षेत्रात एकूण 3180 मतदार आहेत. साकवाळ ग्रामपंचायत साठी 76.09 टक्के मतदान झाले. या पंचायत क्षेत्रात 15,507 मतदार संख्या असून पैकी 11,800 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 6199 पुरुष तर 5601 महिला मतदारांचा समावेश आहे.
चिखली पंचायतीतून पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सरकार ही निवडणूक पक्ष पातळीवर करू शकली असती, परंतु सरकारनेच हा निर्णय मागे घेतला असल्याचे ते म्हणाले. कुठ्ठाळी पंचायतीतून कुठाळीचे आमदार आंतोन वास यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, कोणीही निवडून येऊ दे त्यांचे मी स्वागत करणार. कोणताही भेदभाव न करता निवडून येणाऱ्या उमेदवारांनी एकजुटीने काम करण्याची तयारी ठेवावी असे ते म्हणाले.
दरम्यान कुठ्ठाळी पंचायतीतील उमेदवार रेमंड डीसा व सेनिया परेरा यांनी पैसे वाटल्याच्या एकमेकावर आरोप केला. रेमंड डिसा यांनी आरोप फेटाळून लावले. तर सेनिया परेरा यांनी काल रात्री भरारी पथकाला व पोलिसांना प्राचारण करून रेमंड दिशा याची झटती घेण्यास भाग पाडले. मात्र त्याच्याकडे एकही पैसा मिळाला नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.