Goa Politics: आज जनता बोलणार, उद्या सरकार बदलणार! प्रमोद सावंत सरकार विरोधात काँग्रेसचा 'चलो पणजी'चा नारा

Goa Congress Protest: अमली पदार्थ तस्करी, दलितांवर होणारा अत्याचार, महिलांविरोधात होणारे गुन्हे, राज्यातील वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई याविरोधात काँग्रेसने हे आंदोलन पुकारले आहे.
Goa Congress Calls For Protest
Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: काँग्रेसने सावंत सराकरविरोधात यल्गार पुकारला असून, चलो पणजीचा नारा दिला आहे. 'आज गोव्याची जनता बोलणार, उद्या सरकार बदलणार', अशी घोषणा देत काँग्रेसने सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. सावंत सरकार विरोधात आवाज उठविण्यासाठी २३ एप्रिल रोजी सर्वांना आझाद मैदान येथे एकत्र येण्याचे आवाहन काँग्रेसने केले आहे.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करत आझाद मैदानावरील नियोजित आंदोलनाची माहिती दिली आहे. राज्यातील वाढते गुन्हे, बेरोजगारी आणि महागाई याविरोधात काँग्रेस आवाज उठविण्यासाठी आझाद मैदानावर एकत्र येणार असल्याची माहिती या पोस्टमधून देण्यात आली आहे. राज्यात होणारी अमली पदार्थ तस्करी, दलितांवर होणारा अत्याचार, महिलांविरोधात होणारे गुन्हे, राज्यातील वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई याविरोधात काँग्रेसने हे आंदोलन पुकारले आहे.

Goa Congress Calls For Protest
Goa Congress:...तर 2027 मध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही, पाटकर प्रदेशाध्यक्ष म्हणून योग्य नाहीत; खेमलो सावंत

२३ एप्रिल रोजी आझाद मैदान, पणजी येथे सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या सरकार विरोधी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केले आहे. राज्यातील वाढते अपघात, अमली पदार्थ तस्करी याविरोधात आलेमाव यांनी सरकारवर टीका केली होती. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ठोस पाऊले उचण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती.

Goa Congress Calls For Protest
Shravan Barve Murder Case: श्रवण बर्वे खून प्रकरणात स्थानिकाला अटक; आणखीन गुप्त नावं समोर येण्याची शक्यता

४३ कोटी रुपयांच्या अमली पदार्थ कारवाई प्रकरणी बोलताना राज्य सरकार राज्यातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याचे मत व्यक्त केले होते. तसेच, याप्रकरणामागील मुख्य सूत्रधार शोधण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे. याशिवाय राज्यातील अपघात रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com