Goa Congress: करांमध्ये वाढ करून जनतेची लूट करण्यात भाजप व्यस्त- महिला काँग्रेस

महिला काँग्रेसची टीका- जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak

Goa Congress केंद्रात भाजप सरकार सत्तेवर येण्यापूर्वी आणि नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या सरकारवर महागाईवरून ज्या टीका केल्या, त्याचे व्हिडिओ दाखवित प्रदेश महिला काँग्रेसने गुरुवारी भाजप सरकारवर जोरदार आसूड ओडले.

प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक यांनी भाजप सरकार कर वाढवून जनतेची लूट करीत असल्याची टीका केली. काँग्रेस भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत नाईक यांच्यासमवेत शॅलेट मिरांडा, बेर्था कार्दोज, जरिना शेख आणि अनुराधा नाईक उपस्थित होत्या.

Goa Congress
Sanquelim Palika : विनापरवाना कृतीला थारा नाही; साखळी शहरातील बॅनर्स नगरपालिकेने हटवले

नाईक यांनी विविध वस्तू आणि इंधनावरील वाढीव कराची आकडेवारी मांडत भाजप सरकारला आरसा दाखविला. महागाईचा केवळ काँग्रेस कार्यकर्त्यांवरच परिणाम होत नाही, तर त्याचा परिणाम सर्व जनतेवर होतोय, हे लक्षात घ्यायला हवे.

महागाईवर पंतप्रधान काहीही बोलत नाहीत, उलट करांमध्ये वाढ करून जनतेची लूट करण्यात ते व्यस्त आहेत. सध्या जीवनावश्‍यक वस्तुंच्या किंमती दुप्पट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढल्या आहेत, हे सांगण्याची गरज नाही, असे त्या म्हणाल्या.

Goa Congress
Calangute Beach: झोपड्या हटवण्याच्या आदेशाबाबत मच्छीमारांना मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन; म्हणाले, ''संचालकांबरोबर बैठक...''

‘महागाईत गरिबांनी जगायचे कसे?’

भाजप सरकार घाऊक किंमत निर्देशांकात घट झाल्याची बढाई मारते, तेव्हा ग्राहकांना जीवनावश्यक वस्तूंसाठी जास्त किंमत का मोजावी लागते असा सवाल बीना नाईक यांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाचे दर उतरले आहेत, तरीही पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत नाहीत. स्वयंपाकाच्या गॅस दरात वाढ झाली आहे, अशा स्थितीत गरिबांनी जगायचे कसे? केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण आणण्यात कमी पडले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com