Goa Congress: पियुष गोयलांचे ST आरक्षणाबाबतचे विधान हा भाजपचा आणखी एक जुमला; 2024 मध्ये आम्हीच ST ना आरक्षण देणार- पाटकर

Goa Congress: जनतेला मिस गाईड करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपा सरकारने केलाय.
Amit Patkar
Amit Patkar
Published on
Updated on

Goa Congress: काल पियुष गोयल यांनी st आरक्षणाबाबत जी माहिती दिली त्याबद्दल राज्यातील भाजप सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आनंदोत्सव नसून तमाशा आणि जुमला आहे.

भाजपाला जर खरंच आरक्षण दयायचे असले असते तर ते त्यांनी लगेच दिले असते मात्र त्यांना ST बांधवांच्या तोंडाला पाने पुसायची असल्याचा घणाघात गोवा काँग्रेसचे अमित पाटकर यांनी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केलाय.

ST बांधवांना आरक्षणासाठी रस्त्यावर यावा लागलं हे या बांधवांचे दुर्दैव आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून मुख्यमंत्री आरक्षणाच्या गप्पा मारत आहेत.

विधानसभेतही मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिलंय, मात्र हे सर्व नाटक असून यातून ST बांधवांची सरळ सरळ फसवणूक असल्याचे पाटकर म्हणाले.

पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत गोव्यातील एसटींसाठी राजकीय आरक्षण देण्याबाबत नवा कायदा संमत करणार असल्याचे सांगत ह्या नव्या कायद्याव्दारे राज्यात एसटी समाजासाठी मतदारसंघ राखीव होणार असल्याचे सांगितलं आहे.

मात्र ते पुढच्या अधिवेशनाच्या गोष्टी सांगताहेत ते हास्यास्पद आहे. त्यांना हे ठेवून नाही कि 2024 मध्ये आघाडीचे सरकार स्थापन होणार असून आम्हीच ST बांधवाना सुरक्षा देत त्यांना राजकीय दृष्ट्या सक्षम बनवणार असल्याचे पाटकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

जनतेला मिस गाईड करण्याचा प्रयत्न सातत्याने भाजपा सरकारने केला असून 15 लाख प्रयेकाच्या अकाउंटला येणार हा सर्वात मोठा जुमला PM मोदींनी केला आहे.

काळे धन आणण्याच्या गप्पा मारणाऱ्या भाजप सरकारचे गोव्यातून होणाऱ्या सोने तस्करीवर मात्र मौन असून सरकार या प्रकाराकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याची टीका पालकरांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com