Prepaid Smart Meters: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी कायमस्वरुपी बंद करा! अमित पाटकरांचा वीज खात्याला 15 दिवसांचा अल्टीमेटम

amit patkar 15 day ultimatum goa govt: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
amit patkar 15 day ultimatum goa govt
amit patkar Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: प्रीपेड स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती नव्हे, तर कायमस्वरूपी बंद करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे. यासाठी त्यांनी वीज खात्याला पंधरा दिवसांची मुदत दिली असून, मागणी मान्य न झाल्यास विद्युत भवनासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी विद्युत भवनात वीज खात्याच्या वरिष्ठ अभियंत्यांना निवेदन सादर केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्हणाले की, सरकारने स्मार्ट मीटर जोडणी थांबवल्याचे जाहीर केले असले, तरी नवीन वीजजोडणी देताना, नवीन बांधकामांमध्ये तसेच जुने मीटर बदलताना स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा दहापट जास्त वीजबिले येत असल्याचा दावा त्यांनी केला. ग्राहकांवर स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करू नये, असेही त्यांनी सांगितले.

amit patkar 15 day ultimatum goa govt
Congress Party: 'राहुल गांधींची सभा पार्किंगच्या जागेत, ही काँग्रेसची नामुष्की’; दिगंबर कामत यांचा टोला

औद्योगिक व अन्य क्षेत्रांतील ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यास हरकत नसली, तरी घरगुती ग्राहकांना सक्ती करू नये, अशी काँग्रेसची (Congress) भूमिका असल्याचे पाटकर यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज खाते खासगी उद्योगपतीच्या ताब्यात देण्याचा सरकारचा विचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते लोकसभा खासदार राहुल गांधी हे आपले नेते असल्याने त्यांच्या स्वागताचे पोस्टर फेसबुक पेजवर प्रसिद्ध केल्याचे पाटकर यांनी सांगितले.

amit patkar 15 day ultimatum goa govt
Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

जोडणी तात्पुरती बंद : वीज खाते

वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर जोडणी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. असे असतानाही काही लोक वारंवार याच विषयावर खात्यात का येतात, हे आपल्याला माहीत नाही. या विषयावर सध्या अधिक भाष्य करणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com