Goa: गरीब कल्याण योजनेसाठी समिती स्‍थापन

Goa: सुवर्णा तेंडुलकर यांची माहिती : ग्‍लेन टिकलो यांची निमंत्रकपदी नियुक्‍ती
Goa: Suvarna Tendulkar Addressing Press Conference In Margaon.
Goa: Suvarna Tendulkar Addressing Press Conference In Margaon.Dainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकांच्या भल्यासाठी गरीब कल्याण अन्न योजना (Garib Kalyan Anna Yojana In Goa) सुरू केली आहे. ही राज्‍यातील प्रत्येकापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचविण्यासाठी राज्य तसेच जिल्हा समिती स्थापन करण्यात आल्या असून, राज्य समितीसाठी हळदोणेचे आमदार तथा भाजप प्रवक्ते ग्लेन टिकलो यांची निमंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्‍यक्ष सुवर्णा तेंडुलकर यांनी मडगाव येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात (South Goa BJP Office) घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत दिली.

देशात एप्रिल २०२० ते नोव्हेंबर २०२० पर्यंत २३६ लाख मेट्रिक टन तांदूळ व गहू वितरित करण्यात आले. तसेच ५ लाख मेट्रिक टन डाळ व चणे वितरित करण्यात आले आहेत. गोव्‍यात ४५१ स्वस्त धान्याची दुकाने असून, या दुकानातून लोकांना योजनेचा लाभ देण्यात आला आहे. लोकांना दरमहा ३५ किलो तांदूळ देण्यात येत असून, याबरोबरच या योजनेद्वारे घरातील प्रत्‍येक व्यक्तीला ५ किलो तांदूळ देण्यात येत आहे, असे सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले.

Goa: Suvarna Tendulkar Addressing Press Conference In Margaon.
गोव्यातील हे महाविद्यालय आहे कृत्रिम टर्फ फुटबॉल मैदानाच्या प्रतिक्षेत

गरीब कल्याण अन्न योजनेच्या दक्षिण गोवा समितीसाठी आपली निमंत्रक म्हणून तर उल्हास तुयेकर यांची उपनिमंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर गोव्यासाठी जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उसकईकर यांना निमंत्रक व सचिव आरती बांदोडकर यांना उपनिमंत्रकपदी नियुक्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरोना काळात भाजपचे सेवाकार्य

कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात पडलेल्या लोकांना मदत करण्यासाठी गोव्यात भाजप कार्यकर्त्यांनी ‘सेवा ही संघटन’ हा उपक्रम राबवून साहाय्‍य केले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत १ लाख १२ हजार ६७५ लोकांना जेवणाची पाकिटे देण्यात आली, तर दुसऱ्या लाटेत २३ हजार ५०० लोकांना जेवणाची पाकिटे देण्यात आली, अशी माहिती उल्हास तुयेकर यांनी दिली.

Goa: Suvarna Tendulkar Addressing Press Conference In Margaon.
भूमिपुत्र विधेयक दूरदृष्टी नसलेले, मागे घेण्याची कोमुनिदाद फोरमची मागणी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com