LPG Gas Cylinder: '..बिनसाखरेचा चहा बनवणेही कठीण झाले आहे'! विक्रेत्याने मांडली व्यथा; व्यावसायिक सिलिंडरची अजूनही मारामारी

LPG Gas Cylinder Goa Shortage: व्यावसायिक गॅस सिलिंडरांचा तुटवडा कायम असल्याने येथील हॉटेल-रेस्टॉरंटवाले पुरते अडचणीत अडकले असून हा व्यवसाय सध्या संकटात आला आहे.
Goa LPG Cylinder Shortage
Goa LPG Cylinder ShortageDainik Gomantak
Published on
Updated on

Gas Cylinder Shortage Goa Hotels : व्यावसायिक गॅस सिलिंडरांचा तुटवडा कायम असल्याने येथील हॉटेल-रेस्टॉरंटवाले पुरते अडचणीत अडकले असून हा व्यवसाय सध्या संकटात आला आहे. रविवारी शहरातील चार-पाच हॉटेल वगळता इतर बहुतेक हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती.

खास ''चिकन''साठी प्रसिद्ध असलेले शहरातील एक हॉटेलही रविवारी बंद होते. त्यामुळे ''चिकन'' खवय्यांची पूर्णपणे निराशा झाली. व्यावसायिक सिलिंडरचा निर्माण झालेला तुटवडा पाहता, पुढील आठवड्यापर्यंत बहुतेक हॉटेल्स बंद करावी लागणार आहेत, अशी शक्यता हॉटेल चालकांनी व्यक्त केली.

व्यावसायिक चिंतेत

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील दैनंदिन 'मेनू'वर मर्यादा आल्या आहेत. भाजीचे काही प्रकार करण्याचे हॉटेल चालकांनी टाळले आहे. काही हॉटेल चालकांनी चहावरही मर्यादा आणल्या आहेत.

Goa LPG Cylinder Shortage
LPG Gas Cylinder: व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडाच! दुप्पट दर मोजण्याची वेळ; नागरी पुरवठा खात्याने लक्ष देण्याची गरज

सध्या काही हॉटेलमधून 'स्पेशल चहा' गायब झाला आहे. 'स्पेशल चहा' पुन्हा-पुन्हा बनविणे परवडत नाही. त्यामुळे सध्या साधा चहा करण्यावर भर देण्यात येत आहे. मधूमेह रुग्णांसाठी खास बिनसाखरेचा चहा बनविणेही कठीण झाले आहे, असे एका विक्रेत्याने सांगितले.

Goa LPG Cylinder Shortage
LPG Gas Cylinder: गॅस एजन्सींवर करडी नजर! काळाबाजार रोखण्यासाठी 53 कर्मचाऱ्यांची नियुक्ती; 25 दिवसांनीच होणार बुकिंग

पुढील आठवड्यापर्यंत परिस्थिती निवळली नाही, तर हॉटेलची शटर बंद करावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय तर होणारच आहे; उलट हॉटेल व्यवसाय आर्थिक संकटात येणार आहे, अशी धास्ती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com