LPG Gas Cylinder: व्यावसायिक सिलिंडरचा तुटवडाच! दुप्पट दर मोजण्याची वेळ; नागरी पुरवठा खात्याने लक्ष देण्याची गरज

Gas Supply Shortage In Goa: राजधानी पणजीतही व्यवसायिक सिलिंडरचा पुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. त्यामुळे हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांना दुप्पट दर मोजून सिलिंडर घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.
Goa Gas Cylinder Shoratge
Goa Gas Cylinder ShoratgeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: देशभर गॅस पुरवठ्यावर परिणाम अद्याप कायम असल्याचे चित्र आहे. इतर राज्यांत सिलिंडरची साठेबाजी तसेच व्यावसायिक कारणांसाठी घरगुती सिलिंडरचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. राजधानी पणजीतही व्यवसायिक सिलिंडरचा पुरवठा अद्याप पूर्ववत झालेला नाही. त्यामुळे हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकांना दुप्पट दर मोजून सिलिंडर घ्यावे लागत असल्याचे वास्तव आहे.

व्यावसायिक सिलिंडर वितरकांकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने पुरवठ्यावर त्याचा थेट परिणाम झाला आहे. विशेषतः पणजीतील लहान हॉटेल व्यवसाय यामुळे अडचणीत आले आहेत. काही नामांकित हॉटेलधारकांनाही दोन-तीन पुरवठादारांकडून सिलिंडर मिळवण्याची वेळ येत आहे.

भारत, एचपी, इंडेन, टोटल या कंपन्या सेवा देत असल्या, तरी पुरवठा अपुरा पडत आहे. गोवा नॅचरल गॅसकडून वाहिनीमार्फत गॅस पुरवठा होत असला, तरी बहुतांश व्यावसायिक अजूनही सिलिंडरवरच अवलंबून आहेत. कंपन्यांच्या वितरण कार्यालयांपुढे व्यावसायिकांना सतत हेलपाटे घालावे लागत असून, दररोज सिलिंडर मिळवणे हेच एक नवे ‘काम’ बनले आहे.

कंपन्यांकडून येणारा पुरवठा अपुरा असल्याचे वितरण कार्यालयांकडून सांगितले जात आहे. दरम्यान, एका बाजूला पुरवठा अपुरा असल्याचे सांगितले जात असताना दुसऱ्या बाजूला दुप्पट दर आकारले जात असल्यास नागरी पुरवठा खाते नेमके काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुपारच्या जेवणाच्या थाळ्या बंद

नियमित सिलिंडर घेणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंटधारकांना आजही सिलिंडर मिळवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. काही ठिकाणी परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, दुप्पट रक्कम देऊनही सिलिंडर मिळवावा लागत आहे. परिणामी, अनेक हॉटेलांनी मेनूमध्ये कपात केली असून, काही ठिकाणी दुपारच्या जेवणाच्या थाळ्याही बंद कराव्या लागल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com