Goa Colleges: 'संशोधनात अभ्‍यासाला महत्त्‍वाचे स्‍थान'

प्रा. सचिन मोराईस: केपे सरकारी महाविद्यालयात व्याख्यान
research is Important in study
research is Important in study Dainik Gomantak
Published on
Updated on

केपे: प्रत्येक विद्यार्थ्याला संशोधनाची आवड असली पाहिजे. कोणत्याही विषयावरील संशोधनात अभ्यास महत्त्वाचा असतो. सामाजिक विषयावरील संशोधनही त्यास अपवाद नाही, असे प्रतिपादन पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयातील प्रा. सचिन मोराईस यांनी सरकारी महाविद्यालय केपे येथे केले.

समाजशास्त्र विभागातर्फे आयोजित केलेल्या ‘सामाजिक संशोधन प्रक्रिया आणि पद्धती’ या विषयावरील व्याख्यानात मोराईस बोलत होते. विद्यार्थ्यांना सामाजिक विषयासंदर्भात उत्कृष्ट संशोधन करता यावे, ते कोणत्या पद्धतीने करावे, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे म्हणून समाजशास्त्र विभागातर्फे या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

research is Important in study
प्रत्येकाच्‍या सुखदुःखात सहभागी व्‍हा: रमेश तवडकर

मोराईस यांनी आपल्या व्याख्यानात सामाजिक विषयासंदर्भातील संशोधन कार्य पूर्ण करताना वापरल्या जाणाऱ्या विविध पायऱ्यांविषयी सखोल माहिती दिली. यामध्ये सुप्रसिद्ध पाश्चात्य समाजशास्त्रज्ञ अँथनी गिडन यांनी सांगितलेल्या प्रक्रियेवर त्यांनी भर दिला. संशोधनासाठी विषय निवडण्यापासून ते संशोधनाचा आराखडा कसा तयार करावा, साधनसामग्री कशी मिळवावी, तथ्य संकलन कसे करावे, त्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येऊ शकतात हे त्‍यांनी सांगितले.

research is Important in study
'पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकरांना मंत्रिपद द्या'

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या व्याख्यानाला बीए भाग 2 व 3 मधील सुमारे 65 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्‍यांनी आपल्‍या शंका मान्‍यवरांसमोर मांडल्‍या आणि त्‍यांचे निरसन करून घेतले. त्‍यांच्‍या ज्ञानाचा कस लागला. यावेळी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रियांका वेळीप यांनी प्रास्ताविकात समाजशास्त्र विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचा परिचय करून दिला. प्रा. ईवलीन फर्नांडिस यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रा. सायली गावकर यांनी आभार मानले. व्‍याख्‍याला विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिल्‍याबद्दल प्रा. सचिन मोराईस यांनी त्‍यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com