गोव्यातून कोकेन पुरवठा; कृती दलावर प्रश्नचिन्ह, तीन महिन्यांपूर्वी 'एएनटीएफ'ची स्थापना : अमलीपदार्थ तस्करीला आळा कधी बसणार?

Goa Drug Case: युरोपमधून कोकेन मागवून ते गोवा, मुंबई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर काही प्रश्‍न उपस्थित होत आहेत.
Goa cocaine supply
Goa cocaine supplyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: तेलंगणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत युरोपमधून कोकेन मागवून ते गोवा, मुंबई आणि हैदराबादसारख्या शहरांमध्ये वितरित केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर काही प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इवाला स्टॅनली याचा गोव्यातील अमली पदार्थ व्यवहारात मोठा दबदबा असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या कारवाईमुळे गोव्यात तीन महिन्यांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या ‘अमली पदार्थ विरोधी कृती दल’ (एएनटीएफ) च्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Goa cocaine supply
Goa Marine Export: सागरी निर्यातीत घट, महसुलात वाढ; गोव्यात निर्यातीला मोठा फटका, दरवाढीमुळे एकूण उत्पन्नात वाढ

राज्यातील विविध कायदा अंमलबजावणी संस्थांमध्ये समन्वय वाढवून अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी गोवा सरकारने जानेवारी २०२६ मध्ये एएनटीएफची स्थापना केली होती. या दलाचे नेतृत्व पोलिस महानिरीक्षकांकडे सोपविण्यात आले असून, ते पोलिस महासंचालकांच्या (डीजीपी) देखरेखीखाली कार्यरत राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

गुप्तचर माहितीची प्रभावी देवाणघेवाण, समन्वित मोहिमा आणि अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांवर कठोर कारवाई हा या दलाच्या स्थापनेमागील उद्देश होता. मात्र, तेलंगणा पोलिसांच्या कारवाईतून गोव्यातूनच कोकेन देशाच्या विविध भागांत पाठवले जात असल्याचे उघड झाल्याने, गेल्या तीन महिन्यांत या पथकाने नेमके काय काम केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Goa cocaine supply
Goa Taxi Issue: दक्षिण गोव्यात स्थानिक टॅक्सीचालक आक्रमक, ऑनलाईन टॅक्सीसेवेला तीव्र विरोध; पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

एएनटीएफमध्ये उत्तर गोवा, दक्षिण गोवा, कुशावती, गुन्हे शाखा (क्राईम ब्रँच), कोकण रेल्वे, किनारी पोलिस तसेच दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांसारख्या महत्त्वाच्या विभागांतील पोलिस अधीक्षकांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या पातळीवर अधिकारी असतानाही राज्यात अमली पदार्थांच्या व्यवहारावर प्रभावी नियंत्रण आणण्यात अपयश येत असल्याचे दिसत आहे.

कृती दलाची कृतीच दिसत नाही : पाटकर

क्लबमधील अमली पदार्थांच्या ओव्हरडोसमुळे मध्यप्रदेशातील एका युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याशिवाय राज्यात अधूनमधून अमली पदार्थ व्यवहार उघडकीस येत आहेत. राज्य सरकारने दोन-तीन महिन्यांपूर्वी ‘अमली पदार्थ विरोधी कृती दल’ स्थापन करत मोठा गाजावाजा केला होता.

मात्र, या दलाची कोणतीही ठोस कृती अद्याप दिसून आलेली नाही. उलट तेलंगणा पोलिसांच्या कारवाईमुळे राज्यातील पोलिस यंत्रणेच्या मर्यादा उघड झाल्या आहेत. गोव्यातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती संशयिताकडून समोर आल्याने राज्य सरकारचे अपयश अधोरेखित होते, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com