Goa Sahkar Ratn Award: सव्वा लाखाच्या पुरस्कारासाठी मागवले अर्ज; सहकार चळवळीत योगदान देणाऱ्यांचा होणार गौरव

सहकार रत्न, सहकार भूषण, सहकार श्री पुरस्काराने राज्य सरकार गौरविणार
Goa Sahkar Ratn Award
Goa Sahkar Ratn AwardDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Sahkar Ratn Award: गोव्यात सहकार चळवळीत कार्यरत असलेल्यांचा, सहकार चळवळीत योगदान देणाऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. राज्याच्या सहकार खात्याने सहकार रत्नसह विविध आठ पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत.

सन 2022-23 साठी सहकार पुरस्कारांसाठी शिफरास करण्यासाठी व्यक्तींकडून सहकार चळवळीतील त्या व्यक्तींचे योगदान, कामगिरी आणि सहकार क्षेत्रातील दिलेली सेवा या तपशिलासह हे अर्ज मागविण्यात आले आहेत.

Goa Sahkar Ratn Award
अखेर IIT Goa साठी राज्य सरकारने जागा केली फिक्स; पणजीपासून 80 किलोमीटरवर उभारणार कॅम्पस

असे आहेत पुरस्कार आणि रक्कम

गोवा सरकार रत्न

एका व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 1 लाख 25 हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गोवा सहकार भूषण

हा पुरस्कार देखील एका व्यक्तीला देण्यात येणार आहे. 75 हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गोवा सहकार श्री

50 हजार रूपयांचे रोख बक्षिस आणि स्मृतीचिन्ह असे स्वरूप असलेला हा पुरस्कार एका व्यक्तीला देण्यात येईल.

गोवा राज्य उत्कृष्ट सहकारी सोसायटी

या पुरस्काराने एका सहकारी सोसायटीला स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

तर गोवा राज्य सहकारी सोसायटी प्रोत्साहन पुरस्कार हा दोन सोसायटींना दिला जाणार आहे. स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

तसेच सहकार चळवळीत कार्यरत दोन व्यक्तींना सहाय्य म्हणून प्रत्येकी 50 हजार रूपये रोख बक्षिस देऊन गौरविण्यात येणार आहे.

Goa Sahkar Ratn Award
Goa Drugs Seized: हरमल येथे ड्रग्ज तस्करीप्रकरणी रशियन महिलेला अटक; 4 लाखाचे अमली पदार्थ जप्त

www/coopgoa.gov.in या वेबसाईटवर अर्ज उपलब्ध आहे. तसेच सहकार निबंधक सोसायटीज, सहकार संकूल पणजी याशिवाय सहाय्यक सहकार निबंधक यांच्या पणजी, म्हापसा, फोंडा, मडगाव, केपे आणि डिचोली येथील विभागीय कार्यालयातही अर्ज उपलब्ध आहे.

पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्थांनी अर्ज डाऊनलोड करून भरावेत आणि 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुख्य कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहकारी सोसायट्यांचे उपनिबंधक सीताराम जी. सावळ यांनी केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com