पोर्तुगीज, मुघल, इंग्रज गोव्यात करु शकले नाहीत ते I.N.D.I.A. आघाडी काय करणार? सनातन धर्माच्या मुद्यावरुन CM सावंत बरसले

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार टीका केली.
Goa CM Pramod Sawant On Sanatan Dharma Indore MP
Goa CM Pramod Sawant On Sanatan Dharma Indore MP
Published on
Updated on

Goa CM Pramod Sawant On Sanatan Dharma Indore MP: सनातन धर्माच्या मुद्द्यावरून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि यूपीए आघाडीला कोंडीत पकडण्याची रणनीती भाजप आखत आहे. इंदूर, मध्यप्रदेश येथे भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेत सनातन धर्माचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी I.N.D.I.A. आघाडीवर जोरदार टीका केली.

'यूपीएवरुन नाव बदलून I.N.D.I.A. आघाडीने ज्या प्रकारे सनातन धर्माविरोधात अपशब्द वापरले आहेत, तो हिंदू धर्माचा अपमान आहे. पोर्तुगीज, मुघल आणि इंग्रज गोव्यात जे काम शतकानुशतके करू शकले नाहीत, ते काम I.N.D.I.A वाले करु पाहत आहेत.' अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विरोधकांवर टीका केली.

धर्मांतराचा अजेंडा घेऊन पोर्तुगीज भारतात आले होते, पण तेही काही करू शकले नाहीत तिथे I.N.D.I.A. आघाडीला ते शक्य नाही. त्यामुळे त्यांना येथून हाकलणेच योग्य ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ते होणारच आहे. असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मागील 70 वर्षात जी कामं झाली नाहीत ती कामं भाजप सरकारने केली आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये भारत जागतिक गुरू होण्याच्या मार्गावर आहे. G-20 सारख्या देशासोबत भारताचे संघटन हा त्याचा पुरावा आहे.

Goa CM Pramod Sawant On Sanatan Dharma Indore MP
ख्रिश्चन लोक गोव्यातून परदेशात स्थलांतर का करतायेत? प्रश्नावर CM सावंतांनी इंदूरमध्ये काय दिले उत्तर

यावेळी सावंत यांनी समान नागरी संहितेचा उल्लेखही केला. गोवासारखे एक लहान राज्य दीर्घकाळापासून समान नागरी संहितेचे पालन करत आहे. इतर राज्येही ती स्वीकारण्यासाठी पुढे आली आहेत. असे त्यांनी नमूद केले.

गोव्यातून ख्रिश्चन समुदायाच्या स्थलांतराच्या प्रश्नावर, 'कोणताही समुदाय गोव्यातून स्थलांतरित होत नाहीये, लोक चांगल्या नोकरीच्या संधी आणि कामांमुळे युरोप आणि इतर देशांमध्ये जातायेत. गोवा 15 लाख लोकसंख्येचे छोटे राज्य आहे. त्यामुळे तेथील दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. मध्य प्रदेशसारख्या इतर राज्यांमध्ये खाणकाम आणि इतर संसाधने मुबलक असली तरी, तरीही मोठ्या राज्यांच्या तुलनेत छोट्या राज्यांमध्ये काम करणे अधिक सोयीस्कर आणि सोपे आहे.' असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com