Praveen Arlekar
Praveen ArlekarDainik Gomantak

Dhangar Community: धनगर समाजातील नागरिकांना अर्थसाहाय्य, पाणी बिलात सवलत; आमदार आर्लेकर यांच्या प्रयत्नांना यश

Mopa Airport Displacement Compensation: धनगर समाजातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.
Published on

पेडणे: निवडणूकपूर्व आश्वासन पाळताना पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या प्रयत्नाने मोपा विमानतळामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या धनगर समाजातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत मोपा विमानतळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धनगर समाजातील गंगू लखू वरक, मंदा पाडू वरक, विठू राया वरक, चिमणी ढाकू वरक, सावित्री जानू वरक, चंगू सिधू वरक, सोनू विठू वरक, गीता गंगाराम खरावत, धाकू भागो वरक, सिद्धु बाबू वरक व सोनू राया वरक यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे घर दुरुस्तीसाठी आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.

Praveen Arlekar
Goa Politics: '..हा तर सामान्य जनतेचा विजय'! दिल्ली जिंकल्यानंतर गोव्यात जल्लोष, 2027 मध्ये 27 जागांचा पुनरुच्चार

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अंत्योदय तत्त्वाचे कौतुक करून पेडण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com