CM Pramod Sawant: गोवा-मंगळूरू ही ठिकाणे रेल्वे आणि विमान सेवेने जोडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. नुकतेच विश्व कोकणी केंद्राने मंगळूरू येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत सहभागी झाले होते. तिथून परतल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा-मंगळूरू, गोवा-मुंबई वंदे भारत ट्रेनची गरज आहे. याबाबत रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाला पाठवला जाणार आहे. तसेच रेल्वेत वायफाय कनेक्टिव्हिटीचीही मागणी करणार आहे.
मंगळूरू आणि गोवा ही ठिकाणे विमान सेवेनेही जोडण्याची गरज आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ही हवाई सेवा सुरू करण्याबाबत विचार आहे. त्याचा फायदा दोन्ही ठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला होणार आहे.
दरम्यान, गेल्याच महिन्यात कोकण रेल्वेने मडगाव-मंगळुरू वर रिटर्न अशी प्रवासी रेल्वेगाडी सुरू केली आहे. रविवार वगळता आठवड्यातील पाच दिवस ही रेल्वे धावते. 10107 या क्रमांकाची गाडी मडगावहून पहाटे 5.15 वाजता सुटते व मंगळुरूला त्याच दिवशी दुपारी12.15 वाजता पोहोचते.
10108 क्रमांकाची गाडी मंगळुरूहून दुपारी 2.45 वाजता सुटेल व मडगावला त्याच दिवशी रात्री दहा वाजता पोहोचेल. ही गाडी काणकोण, अस्नोटी, कारवार, अंकोला, गोकर्ण, कुमठा, होनावर, मांकी, मुर्डेश्र्वर, भटकळ, मुकांबिका, सेनापूर, कुंदापूर, बारकूर, उडपी, मुलकी, सुरतकल व मंगळुरू या स्थानकांवर थांबेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.