पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते प्रमोद सावंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. मंगळवारी सावंत आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार आहे. याचबरोबर मुख्यमंत्री सावंत आणि गोवा भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी 10 तारखेला गोव्याच्या जनतेने कुणाला कौल दिला आहे हे स्पष्ट होणार आहे. (Pramod Sawant News Updates)
मुख्यमंत्री सावंत यांचा दावा
2012 च्या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गज काँग्रेस (Congress) नेत्यांनी साखळीत प्रचार केला होता. त्यावेळी आपण सात हजार मतांनी निवडून आलो होतो. त्याचप्रमाणे यावेळीही पाच हजार मताधिक्याने निवडून येणार, असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात कॉंग्रेसचे पारडे जड?
देशातील बहुसंख्य माध्यम समूहाने केलेल्या जनमत चाचण्यांच्या आधारे गोव्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डच्या आघाडीला सर्वाधिक 16 ते 18 जागा मिळतील तर भाजपला (BJP) 14 ते 16 जागा मिळतील असे भाकित वर्तवण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात 2017 प्रमाणेच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येईल असे अंदाज या चाचण्यांमधून पुढे येत आहे. यामुळे मगोप-तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष (AAP) आणि अपक्षांचे महत्त्व वाढणार असून ते सत्तेत महत्वाची भूमिका बजावणार असा अंदाज आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.