Busy Airport List: मोपाचा दाबोळीला फटका; व्यस्त विमानतळाच्या यादीत गोव्याला मागे टाकत जयपूर दहाव्या स्थानी

उड्डाण संचालनाच्या बाबतीत जयपूर विमानतळाने गोव्यातील दाबोळी विमानतळाला मागे टाकले आहे.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak

Busy Airport List

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने व्यस्त विमानतळांच्या यादीत बाजी मारली आहे. जयपूर विमानतळ उड्डाण संचालनाच्या बाबतीत देशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत 10 व्या स्थानावर झेप घेतली आहे.

उड्डाण संचालनाच्या बाबतीत जयपूर विमानतळाने गोव्यातील दाबोळी विमानतळाला मागे टाकले आहे.

जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी संख्या आणि फ्लाइट ऑपरेशन या दोन्हीत तुलनेने चांगली वाढ होत आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीमध्ये, जयपूर विमानतळ जानेवारी 2024 मध्ये फ्लाइट ऑपरेशन्सच्या बाबतीत देशात 10 व्या क्रमांकावर आहे.

कोविडनंतर, जयपूर विमानतळावर प्रवासी संख्या आणि फ्लाइट ऑपरेशन या दोन्हीमध्ये सापेक्ष सुधारणा झालीय. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने जानेवारी 2024 साठी जारी केलेल्या डेटामध्ये जयपूर विमानतळाला 10 वा क्रमांक मिळाला आहे.

फ्लाइट ऑपरेशन्सच्या बाबतीत, जयपूर विमानतळाने गोव्याच्या दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील मागे टाकले आहे. दाबोळी जयपूरपेक्षा खूप मोठे विमानतळ आहे.

दाबोळी विमानतळ मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे उत्तर गोव्यात मोपा येथील सुरु झालेले मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, यामुळे प्रवासी संख्या विभागली गेली.

जानेवारी महिन्यात जयपूर विमानतळावरून दररोज सरासरी 64 उड्डाणे झाली. दररोज सरासरी 17 हजार प्रवासी विमानाने प्रवास करतात.

Dabolim Airport
Mandovi Accident: मांडवी नदीत पडलेल्या दुचाकी चालकाच्या शोधासाठी नौदलाची मदत, कार चालक ताब्यात

कोणत्या विमानतळावरून किती विमान उड्डाणे?

दिल्ली IGI विमानतळ- 36362

मुंबई CSMI विमानतळ- 28275

बेंगळुरू विमानतळ- 21189

हैदराबाद विमानतळ- 15308

चेन्नई विमानतळ- 12436

कोलकाता विमानतळ- 11501

अहमदाबाद विमानतळ- 7926

कोचीन विमानतळ- 5836

पुणे विमानतळ- 5302

जयपूर विमानतळ- 3997

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com