Olympics
OlympicsDainik Gomantak

CM Pramod Sawant: पदकविजेत्या खेळाडूंना मुख्यमंत्र्यांचे ‘स्पेशल गिफ्ट’, प्रत्येकाला मिळणार...

सरकारी नोकरीची घोषणा : सुवर्ण विजेत्यांना 5 लाख, रौप्यपदक 3 लाख, तर कांस्यपदक विजेत्यांना 1 लाखाचे बक्षीस
Published on

CM Pramod Sawant बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिकमध्ये गोव्याच्या खेळाडूंनी घसघशीत 19 पदकांची कमाई केली. या खेळाडूंचा बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यापुढे सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना पाच लाख रुपये रोख आणि सरकारी नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, दिव्यांगजन आयोगाचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावस्कर, सचिव ताहा हाजिक, ऑलिम्पिक भारतचे राष्ट्रीय क्रीडा संचालक व्हिक्टर वाझ, विशेष ऑलिम्पिक गोवाचे अध्यक्ष लुईस फर्नांडिस, वृषाली कार्दोझ आणि मान्यवर उपस्थित होते.

१७ ते २५ जूनदरम्यान बर्लिन येथे झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना रोख ५ लाख रुपये, रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ३ लाख, तर कास्य पदक विजेत्यांना १ लाख रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

Olympics
Tomato Price Hike : गोव्यात पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग; ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांना बसतोय थेट फटका

पदकविजेते गोमंतकीय

सुवर्णपदके  (9) :  गीतांजली नागवेकर (800 मीटर धावणे), सिया सरोदे (पॉवर लिफ्टिंग-2), मॅन्फिल फेर्रांव (बास्केटबॉल), वीणा नाईक (व्हॉलिबॉल), व्हेन्सन पेस, अमन नदाफ, फ्रान्सिस पारिसापोगू आणि ज्योएल रॉड्रिग्स (सर्व फुटबॉल).

रौप्यपदके  (5) :  गीतांजली नागवेकर (400 मीटर), सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), आयुष गडेकर (व्हॉलिबॉल), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), अस्लम गंजानावार (ज्युदो).

ब्राँझपदके (5) :  सिया सरोदे (पॉवरलिफ्टिंग), गेबान मुल्ला (भालाफेक), तानिया उसगावकर (रोलर स्केटिंग), गायत्री फातर्पेकर, काजल जाधव (महिला फुटबॉल).

बर्लिन स्पर्धेतील भारतीय संघात 13 गोमंतकीय खेळाडूंचा समावेश होता. भारतीयांनी या स्पर्धेत 50 पदकांचा टप्पा ओलांडला. या स्पर्धेत गोमंतकीय क्रीडापटूंनी नऊ सुवर्ण, पाच रौप्य व पाच ब्राँझ अशी एकूण 19 पदके जिंकून सुवर्णपदकांत दोन दशकांतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविली.

गोव्याला नावलौकिक मिळवून देतानाच यशस्वी कामगिरीचे शिखर चढण्यासाठी या खेळाडूंनी खूप मेहनत घेतली. पदक मिळो वा ना मिळो, स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड समर गेम्समध्ये सहभागी झालेला तुमच्यातील प्रत्येकजण खरोखरच खास आणि विजेता आहे.

- सुभाष फळदेसाई, समाजकल्याण मंत्री.

आमच्या विशेष खेळाडूंनी पदके जिंकून अभिमानाचे क्षण दिले आहेत. त्यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत मोठे धैर्य, जिद्द आणि कौशल्य दाखवले. सरकारकडून त्यांना दोन महिन्यांत बक्षिसाची रक्कम दिली जाईल. शिवाय आम्ही त्यांना भविष्यात सरकारी क्षेत्रात काम करण्याची संधीही देऊ.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com