Tomato Price Hike : गोव्यात पेट्रोलपेक्षा टोमॅटो महाग; ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांना बसतोय थेट फटका

बेळगावात आवक कमी; दर आणखी वाढण्‍याची शक्‍यता
Tomato Price Hike
Tomato Price HikeDainik Gomantak

जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने कर्नाटक व महाराष्ट्राच्या विविध भागांतून येणाऱ्या टोमॅटोची आवक कमी झाली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दराने तेथेच सध्या शंभरी ओलांडली आहे. बेळगाव बाजारपेठेत आज बुधवारी ‘नंबर वन’ टोमॅटोचा दर १०० रुपये तर गोव्यात तो १२० ते १३० रुपये होता. याचा थेट फटका जनतेबरोबरच हॉटेल व्यावसायिकांना बसत आहे. जीवनावश्‍‍यक पेट्रोलपेक्षा आज टोमॅटो महाग झाला आहे.

बेळगाव परिसरातील शेतात पाणीकमी झाल्याने टोमॅटो रोपट्यांची वाढ झाली नाही, उत्पादन कमी झाले. त्यामुळे दर वाढत आहेत. किमान महिनाभर टोमॅटोचे दर चढेच असतील. शिवाय भाज्‍यांचे दरही वाढत आहेत, अशी माहिती बेळगाव मार्केटमधील व्यापारी व विक्रेत्यांनी दिली.

खिशाला कात्री

सध्या टोमॅटोसह शेपू, मेथी, बिन्स, मिरची, कोथिंबिरीच्या दरातही वाढ झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. पाऊस समाधानकारक न झाल्यास भाजीपाला पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच अतिवृष्टी झाली तरी दर भडकू शकतात. एकंदरीत पाऊस कमी झाला तरी आणि पाऊस खूप पडला तरी लोकांचा खिसा खाली होण्‍याचीच शक्‍यता आहे.

Tomato Price Hike
Goa Monsoon Update 2023: रेड अलर्ट जारी; 9 जुलैपर्यंत मुसळधार बरसणार, आज शैक्षणिक संस्थांना सुटी

महिनाभरात दर उतरणार!

बेळगाव भाजी मार्केटात सातारा जिल्ह्यातील कराड आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक होत असते. मात्र यंदा मे, जूनमध्ये अजिबात पाऊस न झाल्‍याने पिकांवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे भाजीपाल्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. नवा टोमॅटो पुढील महिन्यात दाखल होण्याची शक्यता बेळगाव येथील शेतकरी संजय पाटील यांनी व्‍यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com