Goa CM: 'सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केलाय, त्यांनी देशाची माफी मागावी'; प्रमोद सावंत
Goa CM Dr. Pramod SawantDainik Gomantak

Goa CM: 'सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केलाय, त्यांनी देशाची माफी मागावी'; प्रमोद सावंत

Sonia Gandhi Over President Row: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला 'प्रेमपत्र' म्हणून टीका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांचाही समाचार सावंत यांनी घेतला.
Published on

नागपूर : काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रपतींनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केलेल्या अभिभाषणावर सोनिया गांधींनी मुर्मू भाषण करताना थकल्या होत्या, असे वक्तव्य केले. यावरुन भाजपकडून गांधी यांच्यावर टीका करत असताना आता गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील सोनिया गांधी यांना फटकारले आहे.

नागपुरात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

"काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारे संबोधित करणे केवळ त्या व्यक्तीचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा अनादर आहे, सोनिया गांधींनी देशाची माफी मागावी", अशी मागणी मुख्यमंत्री सावंत यांनी केली.

Goa CM: 'सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केलाय, त्यांनी देशाची माफी मागावी'; प्रमोद सावंत
Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला 'प्रेमपत्र' म्हणून टीका करणाऱ्या खासदार पप्पू यादव यांचाही समाचार सावंत यांनी घेतला. "पप्पू यादव यासारख्या लोकांना लोकशाही कळत नाही. आज 75 वर्षे पूर्ण झालेल्या संविधानाच्या आधारे आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत जातो. या लोकांनी काही बोलताना संविधानाचा आदर करावा", असे सावंत म्हणाले.

गेल्या 10 वर्षांत दिल्लीतील नागरिकांना खरं - खोटं यातला फरक कळाला आहे. यावेळी दिल्लीत 100 टक्के भारतीय जनता पक्षाचे 'डबल इंजिन' सरकार सत्तेवर येईल. दिल्लीतील जनतेलाही मोदींच्या नेतृत्वाखाली झालेला विकास हवा आहे, असे सावंतांनी मत मांडले.

Goa CM: 'सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतीपदाचा अपमान केलाय, त्यांनी देशाची माफी मागावी'; प्रमोद सावंत
Amruta Arora Goa Restaurant: मलायका अरोराच्या बहिणीने गोव्यात सुरु केलं रेस्टॉरंट; सोशल मीडियावर पोस्ट करून दिली खुशखबर!!

'महाकुंभ हे सनातन संस्कृतीचे प्रतीक आहे, तेथे झालेल्या अपघाताने मला दु:ख झाले आहे. असे व्हायला नको होते, तरीही हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आलाय. मी सर्वांना या महाकुंभात सहभागी होऊन, पवित्र स्नान करण्याचे आवाहन करतो', असे सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com