Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा

Ten Important Points Of Union Budget 2025: र्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी धनधान्य योजना जाहीर केली आहे.
Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा
Union Budget 2025 | Nirmala SitharamanDainik Gomantak
Published on
Updated on

10 Important Points Of Union Budget 2025

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (०१ फेब्रुवारी) देशाचा अर्थसंकल्प सादर केला. सर्व देशाचं लक्ष लागून राहिलेल्या या अर्थसंकल्पात शेती, पर्यटन, वैद्यकीय, कर प्रणाली आणि उद्योग क्षेत्रासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. १२ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याचा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

१) शेतकऱ्यांसाठी कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या

- अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी धनधान्य योजना जाहीर केली आहे. कमी उत्पादनाच्या १०० जिल्ह्यात याचे काम केले जाईल.

- मखाणा उत्पादन वाढवण्यासाठी बिहारमध्ये मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार.

- अंदमान आणि लक्षद्वीप बेटांसाठी मत्स्यबोर्डाची स्थापना केली जाणार.

- किसान क्रेडिट कार्ड्च्या कर्जाची मर्यादा पाच लाख करणार.

२) लघु-मध्यम उद्योग

- लघु-मध्यम उद्योगांना भांडवल उभारणं सोपं केलं जाणार, उद्योगांसाठी क्रेडिट कार्ड लाँच करण्याची योजना.

- मागासवर्गीय महिलांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण, पाच लाख महिलांना मिळणार प्रशिक्षण

- चामड्यांची पादत्राणे बनविण्यासाठी योजना, भारताला जागतिक खेळणी निर्मिती केंद्र बनवणार

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा
Nuvem: नुवेतील भाडेकरूंची तपासणी तीव्र करा! मंत्री सिक्वेरांचा आदेश; ड्रग्स व्यवहारांचा बिमोड करण्याचेही निर्देश

३) शिक्षण आणि आरोग्य

- सर्व जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सुरु करणार, सर्व सरकारी शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सुविधा देणार

- कृत्रिम बृद्धीमत्ता शिक्षणासाठी ५०० कोटींची तरदूत, एआय एक्सलन्स सेंटर सुरु केली जाणार

- पंतप्रधान संशोधन फेलोशिप- तंत्रज्ञान संबधित संशोधनासाठी दहा हजार फेलोशिप दिल्या जाणार

४) पर्यटन

- बुद्धांच्या आयुष्याच्या निगडीत पर्यटन स्थळांवर भर, वैद्यकीय पर्यटनावरही दिला जाणार भर

- उडान योजनेअंतर्गत पुढील दहा वर्षात १२० नव्या ठिकाणांना कनेक्टिव्हिटी देण्याचा विचार

५) आयकर

- १२ ते १९ लाखांपर्यंत ७० हजारांची सूट, १८ लाखांच्यावर ३० टक्के कर भरावा लागणार

- १२ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे.

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा
Mayem: 'कस्टोडीयन कायद्या'तील त्रुटी दूर करा, मयेवासीयांची मागणी; डिसेंबरपर्यंत दिली सरकारला मुदत

६) वैद्यकीय क्षेत्र

- कर्करोग आणि असाध्य आजाराच्या उपचारासाठीच्या ३६ औषधांवरील कस्टम ड्युटी माफ

- पाच जीवनावश्यक औषधांवरील ड्युटी माफ करण्याचा निर्णय.

७) काय स्वस्त होणार?

- मोबाईल फोनची बॅटरी स्वस्त होणार

- टीव्हीचे देशात उत्पन्न होणारे पार्ट्स स्वस्त होणार

- इलेक्ट्रीक वाहने देखील स्वस्त होणारेत

- खेळणी स्वस्त होणार

८) काय महाग होणार?

- फ्लॅट सुशोभीकरणासाठी लागणारे पॅनल डिस्पले महाग होणारेत. सरकारने यावरील कस्टम ड्युटी १० वरुन २० टक्के करण्यात आली आहे.

Union Budget 2025: 12 लाखांपर्यंत कोणताही टॅक्स नाही; केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 महत्वाचे मुद्दे वाचा
Velsao: रस्त्याच्या दुसऱ्या बाजूलाही मातीचा भराव! वेळसाववासीय संतप्त; भूसंपादन न करता रेल्वेने काम सुरु केल्याचा दावा

९) नवी कररचना कशी आहे?

० ते ४ लाख – 0 टक्के कर द्यावा लागेल

४ ते ८ लाख – ५ टक्के कर

८ ते १२ लाख – १० टक्के कर

१२ ते १६ लाख – १५ टक्के कर

१६ ते २० लाख – २० टक्के कर

२० ते २४ लाख – २५ टक्के कर

२४ लाख – ३० टक्के कर

१०) काही महत्वाच्या घोषणा

- घरांना नळ जोडणी देण्याची मोहीम २०२८ पर्यंत सुरु राहणार असल्याचे सीतारमण यांनी स्पष्ट केले.

- वैद्यकीय शिक्षणासाठीच्या १० हजार जागा वाढवण्याचा निर्णय.

- ज्येष्ठ नागरिकांसाठी टीडीएस मर्यादा एक लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com