Goa Cm Pramod Sawant In Ujjain: गोव्यातून पोर्तुगिजांच्या खुणा पुसल्या पाहिजेत असे म्हणणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीची तुलना पोर्तुगिजांशी केली. मध्यप्रदेशातील इंदूर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी असे वक्तव्य केले.
सनातन हिंदू धर्म संपवण्याचा या आघाडीचा कट आहे, तसाच कट पोर्तुगिजांनीही गोव्यात रचला होता, असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी - २० परिषदेच्या यशस्वी आयोजनाच्या निमित्ताने काल रात्री दिल्लीत मेजवानीचे आयोजन केले होते. त्याला मुख्यमंत्री उपस्थित होते. तेथून मध्यरात्रीच त्यांनी उज्जैन गाठले.
उत्तररात्री २ वाजता महाकाल मंदिरात होणाऱ्या भस्म आरतीत ते सहभागी झाले. मंदिरात पोचल्यावर नंदी सभागृहात त्यांनी काहीवेळ प्रतीक्षा केली आणि नंतर देवदर्शन केले.
देवस्थानकडून त्यांना श्रींची प्रतिमा भेट देण्यात आली. त्यांच्यासोबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार डॉ. दिव्या राणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामोदर नाईक होते. श्रावणातील शेवटच्या सोमवारनिमित्त मुख्यमंत्र्यांनी अभिषेकही केला.
मध्यप्रदेशात सध्या भाजपची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. ३ सप्टेंबरपासून ती सुरू झाली असून त्यात दररोज एक राष्ट्रीय नेता सहभागी होतो.
आज मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय, मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष खासदार विष्णूदत्त शर्मा या यात्रेत सहभागी झाले.
खरमपुरा येथून या यात्रेला सुरवात झाली होती. वाटेत इंदूर येथे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना संबोधित केले.
मुघल, ब्रिटीशांनाही सनातन हिंदू धर्म संपवता आला नाही ते करण्यास ही इंडिया आघाडी निघाली आहे, अशी खिल्ली त्यांनी उडवली. मुख्यमंत्री उद्या व परवा मध्यप्रदेशात असून ते काही राजकीय सभांना संबोधित करणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.