Monsoon 2025: मुख्यमंत्री सावंतांनी घेतली मॉन्सूनपूर्व आढावा बैठक; आपत्ती व्यवस्थापनावर केली चर्चा

Goa CM Pramod Sawant Reviews Pre-Monsoon Preparedness: राज्यात लवकरच दाखल होणाऱ्या नैऋत्य मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (19 मे) राज्यातील मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात लवकरच दाखल होणाऱ्या नैऋत्य मॉन्सूनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी (19 मे) राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेतला. पर्वरी येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश

दरम्यान, मुख्यमंत्री सावंत यांनी या बैठकीत राज्यातील पूरग्रस्त भागातील धोक्याच्या क्षेत्रांमध्ये वेळेवर उपाययोजना करण्यावर भर दिला. तसेच, मॉन्सूनपूर्व तयारीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी मंजूर करण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी ₹35,000, ‘ब’ श्रेणीतील नगरपालिकांसाठी ₹60,000 आणि ‘अ’ श्रेणीतील नगरपालिकांसाठी ₹1,10,000 इतका आर्थिक निधी वितरीत करण्यात आल्याचे देखील मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केले.

Goa CM Pramod Sawant
Monsoon 2025: राज्यभरात पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्क राहण्याचा सल्ला

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री सावंत यांनी संबंधित विभागांना निर्देश दिले की, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक विभागाने एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. यासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला जीर्ण आणि धोकादायक इमारतींची यादी तयार करुन त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले. तसेच, नद्यांमधून गाळ काढणे आणि जलसाठ्यांचा योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी जलसंपदा विभागाला विशेष जबाबदारी देण्यात आली.

बैठकीला कोण उपस्थित होते

बैठकीला राज्याचे महसूल मंत्री, मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, वीज विभाग, जलसंपदा विभाग, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आरोग्य विभाग, तसेच भारतीय नौदलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Goa CM Pramod Sawant
Monsoon 2025: ..नभ उतरू आलं! अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल; 5 दिवस आधीच आगमन

मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. राज्यात दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मान्सून दाखल होतो. त्यामुळे नागरिकांनी देखील आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com