Pooja Naik: 'पूजा नाईकचे सर्व दावे खोटे!' गोवा पोलिसांच्या तपासावर मुख्यमंत्र्यांचा शिक्कामोर्तब; म्हणाले, तपास अजूनही थांबलेला नाही...

CM Pramod Sawant: कथित कॅश फॉर जॉब प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने केलेले सर्व दावे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले.
Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: कथित कॅश फॉर जॉब प्रकरणातील प्रमुख आरोपी पूजा नाईक हिने केलेले सर्व दावे पूर्णपणे चुकीचे आणि निराधार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले. पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपशीलवार तपास केला. मला यासंबंधीचे सगळे अहवाल मिळाले आणि ते तपासले असता पूजा नाईकने केलेल्या कोणत्याही दाव्यात तथ्यता नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलिसांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन तपासणी केली

पोलिसांनी या प्रकरणाचा किती गांभीर्याने तपास केला याबाबत मुख्यमंत्री म्हणाले, "तपास पथकाने या घोटाळ्याशी संबंधित उल्लेख असलेल्या प्रत्येक ठिकाणाला भेट दिली आणि प्रत्येक माहितीची सत्यता तपासली." यापूर्वी, पूजाने आपण महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या कार्यालयात काम करत असल्याचा' दावा केला होता. परंतु, पगार मिळाल्याच्या नोंदी, ओळखपत्र किंवा हजेरीचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. मात्र आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीमुळे पूजाचे हे राजकीय दावे खोटे ठरले.

Goa CM Pramod Sawant
Pooja Naik: 'पूजा नाईकच लोकांना फसवत होती', गुन्हे शाखेचा मोठा खुलासा! 17.68 कोटी रुपयांच्या 'कॅश फॉर जॉब'चे आरोप खोटे

तपास अजूनही थांबलेला नाही

या प्रकरणाच्या सद्यस्थितीबद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, केवळ आरोपीचे दावे खोटे ठरले म्हणून तपास थांबलेला नाही. ही केस अजूनही सुरु आहे आणि चौकशी सध्याही सुरुच आहे. या घोटाळ्यामागील आणखी काही गोष्टी किंवा व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले. पूजा नाईक ही अनेक बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मुख्य आरोपी आहे. मुख्यमंत्र्यांच्या या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणावर होणारे राजकीय आरोप थांबण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

cm pramod sawant
Pramod Sawant Mapusa Fish Market Visit
Goa Police Srinivas Naik Investigation
Srinivas Naik Shooting Case Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com