Pooja Naik: 'पूजा नाईकच लोकांना फसवत होती', गुन्हे शाखेचा मोठा खुलासा! 17.68 कोटी रुपयांच्या 'कॅश फॉर जॉब'चे आरोप खोटे

Pooja Naik fraud allegations: गोवा गुन्हे शाखेने 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी पूजा नाईक हिने सरकारी अधिकाऱ्यांवर केलेले १७.६८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप पूर्णपणे फेटाळले
 cash for job goa
cash for job goaDainik Gomantak
Published on
Updated on

Cash for job scam update: गोवा गुन्हे शाखेने 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याप्रकरणी पूजा नाईक हिने सरकारी अधिकाऱ्यांवर केलेले १७.६८ कोटी रुपयांच्या फसवणुकीचे आरोप पूर्णपणे फेटाळले आहेत. क्राईम ब्रांचचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पूजा नाईक हिने सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध जे दावे केले होते, त्याला कोणताही ठोस पुरावा आढळून आलेला नाही.

प्रत्येक दावा खोटा ठरला

गुन्हे शाखेच्या चौकशीत पूजा नाईक यांचे प्रत्येक विधान खोटे ठरले आहे. पूजा नाईक हिने उल्लेख केलेल्या पार्टी ऑफिसमध्ये तिने कधीही काम केले नसल्याचे चौकशीत समोर आले. तसेच तिने ६१३ उमेदवारांच्या नावाची जी डायरी असल्याचा दावा केला होता, ती देखील अस्तित्वातच नसल्याचे तपासात सिद्ध झालेय.

 cash for job goa
Pooja Naik: '..ते पैसे देण्यास तयार नाहीत, त्यांना न्यायालयात खेचणार'! पूजा नाईकचा खुलासा; IAS देसाईंची नोटीस न मिळाल्याचा दावा

क्राईम ब्रांचने दिलेल्या माहितीनुसार पर्वरी येथील ज्या फ्लॅटचा वापर रोख रकमेचे व्यवहार करण्यासाठी केला गेला, असा दावा तिने केला होता, तो फ्लॅट केवळ विद्यार्थ्यांना भाड्याने दिला जात असल्याचे आढळून आलेय.

पूजा नाईककडे व्हिडिओ पुरावा असल्याच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांनी मोबाईलचा माग घेतला. तेव्हा तो मोबाईल नाईक हिच्या पतीने विकल्याचे निष्पन्न झाल्याने पुराव्याचा दावाही खोटा ठरलाय.

नाईक आणि कुटुंबाचे कोट्यवधींचे व्यवहार उघड

सरकारी अधिकाऱ्यांवरील आरोपांच्या चौकशीत गुन्हे शाखेला नाईक आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या बँक खात्यांमधून ८.०६ कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळले. या रकमेतून लक्झरी वाहने, दागिने आणि मोठ्या मालमत्तांची खरेदी केल्याचेही उघड झाले आहे.

चौकशीत हेही समोर आले आहे की, नोकरीची आशा दाखवून पैसे दिलेल्या उमेदवारांनी परताव्याची मागणी सुरू केल्यानंतर त्यांच्यापासून लपण्यासाठी पूजा नाईक अनेक महिने हॉटेल्समध्ये राहत होती. पूजा नाईकवर यापूर्वीच पाच फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

गुन्हे शाखेने निष्कर्ष काढला आहे की, पूजा नाईकने लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल केली आणि नोकरीच्या बहाण्याने पैसे गोळा करून फसवणूक केली आहे. गुन्हे शाखेने फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com