CM Pramod Sawant: नवीन मतदारसंघाबरोबरच आरक्षण निश्चित होणारच, विधानसभेतही ठराव संमत

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : सुर्ल येथे गोमंतकीय गौड मराठा समाजाचा वर्धापनदिन सोहळा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant एसटी समाजबांधवांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघटित राहून प्रयत्न करावेत, त्यातून समाजाचा उत्कर्ष होईल. या समाजाला ‘एसटी’चा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.

त्यांना हा दर्जा मिळवून देण्यात देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी व माजी संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान होते.

या समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी हे सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुर्ला येथे केले.

गोमंतक गौड मराठा समाजाच्या ६१व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन बाये सुर्ला येथील श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सभागृहात सोमवारी (ता.२१) करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रकाश वेळीप, वासुदेव मेंग गावकर, खुशाली वेळीप, विश्वास गावडे, खुशाली वेळीप, प्रकाश गावकर, सूर्यकांत गावडे, दया गावकर, नारायण कामत, मोहन घाडी आदी उपस्थित होते.

भाजपनेच या समाजाला मोठा न्याय दिला आहे. अजूनही अनेक योजनांपासून हे लोक वंचित आहेत. त्यांनी समाजासाठी एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. या समाजाला राजकीय आरक्षणासाठी सरकारने पूर्ण प्रयत्न सुरू केले आहेत.

भारतीय घटनेनुसार हा अधिकार या समाजाला मिळायलाच हवा. त्याची प्रक्रिया आम्हीच सुरू केली आहे. केंद्राच्या सूचनेनुसार मतदारसंघ फेररचनेसाठी लोकसंख्या गणना होणे गरजेचे आहे.

त्यामुळे नवीन मतदारसंघाबरोबरच आरक्षण निश्चित होणार असून आम्ही विधानसभेत ठरावही संमत केलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी समाजबांधवांना दिली.

CM Pramod Sawant
Hill Cutting In Pomburpa Village: 'कुठल्याही स्थितीत प्रकल्प उभा राहू देणार नाही', एकोशीवासीयांचा इशारा; डोंगरकापणीला विरोध

ज्येष्ठांचा सत्कार

यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक शाबू गावकर, रामकृष्ण गावडे, वामन पिळगावकर, विठू तळेकर, सदानंद तातू गावडे, भानू गावकर, सोनू गावकर आदींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

आदिवासी भवनाची आम्ही पायाभरणी केली. मात्र, समूहातीलच काही लोकांनी उच्च न्यायलयात खटले दाखल करीत या कामाला अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आदिवासी भवन उभारण्यात येणार आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com