Hill Cutting In Pomburpa Village: 'कुठल्याही स्थितीत प्रकल्प उभा राहू देणार नाही', एकोशीवासीयांचा इशारा; डोंगरकापणीला विरोध

वनक्षेत्रावर अतिक्रमण: 48 हजार चौ.मी. जमिनीवर 140 व्हिलांचा प्रकल्प
Hill Cutting In Pomburpa Village
Hill Cutting In Pomburpa VillageDainik Gomantak
Published on
Updated on

Hill Cutting In Pomburpa Village: पोंबुर्फा ग्रामस्थांनी गावातील डोंगर कापणीला आक्षेप घेत, सदर बांधकाम हे बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. ही जागा अविकसित क्षेत्र आहे. या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम सुरू असताना डोंगराच्या बाजूला अनेक झाडे कापण्यात आली आहेत.

ज्या ठिकाणी हा मेगा प्रकल्प उभा राहत आहे, तो भाग हळदोणे मतदारसंघातील पोंबुर्फा-ओळावली पंचायत कार्यक्षेत्रातील एकोशी परिसरात आहे.

संपूर्ण टेकडीही वनक्षेत्रात असून हे निसर्गावरील अतिक्रमण आहे. ज्या भागात बांधकाम सुरू आहे, तो परिसर टीसीपीने सेटलमेंट क्षेत्र म्हणून दाखवला आहे. हे क्षेत्र घनदाट हिरवागार परिसर आहे.

अशावेळी हे क्षेत्र सेटलमेंट क्षेत्रात कसे रूपांतर केले, याची आम्हाला कल्पना नाही. जो भाग विकसित केला जाणार आहे, तो सुमारे ४८ हजार चौरस मीटर आहे. येथे जवळपास १४० व्हिला तयार होत आहेत, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

यासंदर्भात स्थानिकांनी मंगळवारपासून पोंबुर्फा तसेच एकोशी परिसरात फिरून या मेगा प्रकल्पाच्या विरोधात जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. कुठल्याही परिस्थितीत आम्ही डोंगर नष्ट करून प्रकल्प उभा राहू देणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

याशिवाय या वनक्षेत्राच्या विध्वंसासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. पंचायत किंवा लोकप्रतिनिधींनी या मेगा प्रकल्पाविषयी स्थानिकांना विश्वासात घेतलेले नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

ग्रामस्थांनी जागोजागी विरोध करणाऱ्या फलकांची उभारणी करून गाव नष्ट होण्यापूर्वी गावाचे संरक्षण करण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा, असे त्यातून म्हटले आहे.

Hill Cutting In Pomburpa Village
Khandepar News: मुर्डीतल्या 144 कलमाबाबत स्थानिक आमदार अनभिज्ञ; सरकारकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न- भाटीकर

नैसर्गिक संपदेवर परिणाम करणारा हा प्रकल्प कुठल्याच परिस्थितीत होऊ देणार नाही. त्यासाठी कुठल्याही स्तरावर जाऊन विरोध करण्याची तयारी आहे.

- प्रदीप वळवईकर, ग्रामस्थ.

पोंबुर्फा पंचायत क्षेत्रातील एकोशी गावातील पूर्ण वनक्षेत्र या प्रकल्पामुळे नष्ट होणार. प्रकल्प गावच्या हिताचा नसून प्रकल्पातून गावातील लोकांचा विश्वासघात केला गेलाय.

- धिरेंद्र फडते, ग्रामस्थ

या प्रकल्पा संबंधी पंचायतीने ग्रामस्थांना विश्वासात घेतले नाही. ग्रामसभेतही या प्रकल्पासंदर्भात माहिती लोकांना दिलेली नाही. त्यामुळे एकूण पूर्ण प्रक्रियेवर शंका व्यक्त होते.

- सुनील कारापूरकर, ग्रामस्थ

Hill Cutting In Pomburpa Village
Goa Monsoon 2023: गोव्यात आगामी दोन ते तीन तासात जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

झरे, विहिरीवर संक्रांत

या मेगा प्रकल्पामुळे गावातील झरे व विहिरी नष्ट होतील. पंचायतीकडे मेगा प्रकल्पाविषयी दस्तऐवज मागितल्यास पंचायतीकडून सहकार्य मिळत नाही.

या प्रकल्पास परवानगी असल्याचे सांगितले जात असले तरी हे परवाने बेकायदा असल्याचा कथित आरोप स्थानिकांनी केला आहे..

कारण, टेकडीवर बांधकाम येऊच शकत नाही व कायद्यात ते बसत नसल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com