

साखळी : अखिल गोमंतक भंडारी समाज समातीवर प्रशासक नेमल्याने सध्या ‘ओबीसी’ दाखले देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत डिचोली तालुका भंडारी समाज समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
ओबीसी दाखले देण्यासंदर्भात अद्याप स्पष्टता नसल्याने हा गुंता सोडवून भंडारी समाजाचा ओबीसी दाखल्यासाठी समाज दाखला देण्यासंदर्भात दिशा ठरवावी, अशी मागणी तालुका समितीच्या शिष्टमंडळाने केली. यावर आपण लवकरच प्रशासकाशी चर्चा करून या विषयावर तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले.
सध्या भंडारी समाजातील विद्यार्थी व इतरांना ओबीसी दाखल्यासाठी समाजाच्या दाखल्याची किती प्रमाणात गरज आहे, याची जाणीवही आपणास आहे, त्यामुळे याविषयी मी प्रशासकाशी चर्चा करणार आहे, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी डिचोली तालुका भंडारी समाज समिती अध्यक्ष सुशांत पेडणेकर, खजिनदार गौरव परब, कुडणेचे सरपंच दामोदर पेठकर, पाळीचे सरपंच संतोष नाईक, माजी सरपंच संजय नाईक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा : सुशांत पेडणेकर
गोव्यातील भंडारी समाज समितीवर सध्या सरकारने प्रशासक नेमला आहे. त्यामुळे सध्याची केंद्रीय व तालुका समित्यांकडे कोणतेही अधिकार राहिले नाहीत. सध्या समाजाचा दाखला देण्यासंदर्भात प्रशासकाकडून कोणतीही स्पष्टता नाही.
अशा परिस्थितीत लोकांना समाज दाखला देणेही वैध नसल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाच भेटून यावर तोडगा काढण्याची तोंडी मागणी केल्यानंतर त्यांना रितसर एक निवेदन देण्यात आले आहे, असे तालुका समिती अध्यक्ष सुशांत पेडणेकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.