गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची कर्नाटकमध्ये भाजपसाठी 'विजय संकल्प यात्रा', 150 हून अधिक जागांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज कर्नाटकमध्ये 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
Pramod Sawant In Karnataka
Pramod Sawant In KarnatakaDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रचार रॅली आणि अनेक विकास कामांचे उद्घाटन करणाऱ्यावर भर देत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आज कर्नाटकमध्ये उपस्थिती लावत, 16,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. याचवेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील कर्नाटकमध्ये आपल्या पक्षासाठी प्रचार रॅली केली.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांच्यासह दक्षिण कन्नड भागातील प्रचार रॅलीत भाग घेत त्यांना संबोधित केले. यावेळी कर्नाटकमधील भाजप नेते देखील उपस्थित होते.

"भाजप कार्यकर्त्यांच्यात यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री बोम्मई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील डबल इंजीन सरकारने केलेल्या विकासाचे येथील लोक साक्षीदार आहेत. मला विश्वास आहे की येथील जनता विकासाचा संकल्प पुढे घेऊन जातील आणि भाजपला राज्यात 150 हून अधिक जागांसह बहूमत देतील." असे ट्विट मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

Pramod Sawant In Karnataka
Ponda: नऊ महिने पाण्याचे बील दिलेच नाही, आले तेव्हा सर्वांचे डोळेच फिरले

दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील कर्नाटक दौऱ्यावर असताना त्यांनी बेंगलोर- म्हैसूर एक्सप्रेसवेचे उद्धाटन केले. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी मंड्यामध्ये सुमारे 2 किलोमीटरचा रोड शो केला. रोड शो दरम्यान हजारो लोक उपस्थित होते. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यावर पुष्पवृष्टी केली जात आहे. 

मोदीची कबर खोदण्याची स्वप्ने पाहणाऱ्या कॉंग्रेसला माहित नाही की देशातील लाखो करोडो माता भगिनींचा आशिर्वाद मोदीच्या पाठीशी आहे आणि तो माझा सुरक्षा कवच आहे असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

2014 च्या आधी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते. तेव्हा सामान्य गरीब जनतेला लुटण्याचे काम केले. जे पैसे गरीबांच्या विकासासाठी होते ते कॉंग्रेस (Congress) ने लुटले असेही मोदींनी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

PM Modi Digital India New Chapter
Modi government political challenge
Karnataka High Court Ruling
Goa Assembly ST Reservation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com