Goa Assembly Election: भाजप 'मगो'ला सोबत घेऊनच विधानसभा लढणार; ढवळीकरांना दिल्लीत आश्वासन

Goa BJP And MGP Crisis: तुमच्या साथीनेच पुढील निवडणूक लढवू; भाजपचे 'मगो' नेत्यांना आश्वासन
bjp mago alliance goa
Impact of BJP-MGP alliance on Goa elections 2027Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: भाजप 'मगो'ला सोबत घेऊनच विधानसभा निवडणूक लढवली जाईल, असे आश्वासन पदरात पाडून 'मगो'चे नेते दिल्लीहून राज्यात परतले आहेत. असे असले तरी निवडणुकीपूर्वी राजकीय सर्वेक्षणानंतर कोणी कुठे निवडणूक लढवायची ते ठरेल, असे सांगून भाजप नेत्यांनी राजकीय डाव आपल्या हातीच ठेवलेला आहे.

'मगो'चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांची दिल्ली भेट ही पूर्वनियोजित होती. त्याच दरम्यान आधी मांद्रेमध्ये आणि नंतर प्रियोळमध्ये खुद्द मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्याकडून राजकीय वक्तव्ये केली गेली. त्यामुळे भाजप मगोची युती राहील की नाही याविषयी शंका निर्माण झाली. त्यामुळे तोही विषय दिल्लीतील बैठकीत उपस्थित केला.

bjp mago alliance goa
BJP MGP alliance Goa: भाजप - मगोची युती कायम राहणार? ढवळीकर बंधुंना बी. एल. संतोष यांनी दिल्लीत काय आश्वासन दिले?

विधानसभा निवडणुकीनंतर आम्हाला भाजपच्या नेत्यांनी दिल्लीत बोलावून युती हवी असे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे त्यात बदल झाला की काय अशी शंका आली होती. भाजपच्या नेत्यांनी निःसंशयपणे युती राहील आणि आगामी निवडणुकीला दोन्ही पक्ष एकत्रितपणे सामोरे जातील असे स्पष्ट केले आहे.

प्रियोळबाबत मुख्यमंत्र्यांची दिशाभूल

दीपक ढवळीकर प्रियोळ मतदार संघातून दीपक ढवळीकर निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत असा चुकीचा अर्थ कोणीतरी काढला. ती चुकीची माहिती मुख्यमंत्र्यांना देऊन त्याने त्यांची दिशाभूल केली, असा आरोपही ढवळीकर यांनी केला. मुख्यमंत्र्यांची त्यात काही चूक नाही. स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीच्या आधारेच राजकीय वक्तव्ये केली जातात, असेही ते म्हणाले

bjp mago alliance goa
Konkan Railway: कोकण रेल्वेची 8 स्थानकं होणार अपडेट, विमानतळासारखी मिळणार सुविधा; गोव्यातील एक स्थानकाचा समावेश

सर्वेक्षणानंतरच कोणी कुठून लढायचे ठरेल!

'मगो'चे कार्यकर्ते अनेक मतदारसंघात आहेत. त्यांचे मनोबल उच्च ठेवण्यासाठी नेत्यांनी त्या त्या मतदारसंघात बैठका घ्याव्या लागतात. प्रत्येक पक्ष तसे करत असतो. याचा अर्थ तो पक्ष तेथूनच निवडणूक लढवणार आहे, असा होत नाही. निवडणुकीआधी राजकीय सर्वेक्षण होईल आणि त्याच्यातूनच कोणी कुठे निवडणूक लढवायची हे ठरेल, असे भाजप नेत्यांनी स्पष्ट केल्याचेही ढवळीकर यांनी सांगितले आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com