CM Pramod Sawant: बाह्य परीक्षार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया सुलभ करा- सावंत

CM Pramod Sawant: बोर्डाला 50 वर्ष पूर्ण होण्याअगोदर नूतन वस्तू उभारण्याचे काम होतंय ही आनंदाची गोष्ट - सावंत
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बाह्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेय. "गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आणि सचोटीने अभ्यास करून परीक्षा देणे गरजेचे आहे.

CM Pramod Sawant
Bicholim: धक्कादायक! डिचोलीत 24 वर्षीय महिलेला तीन पुरुषाकडून गंभीर मारहाण, गुन्हा नोंद

सुशिक्षित विद्यार्थी आपल्या ज्ञानाच्या जोरावर निरनिराळी कौशल्ये आत्मसात करू शकतात. कारण शिक्षण क्षेत्रातील सुधारणा ह्या केवळ नोकऱ्यांसाठी नसून कौशल्यासाठी असल्याचेही सावंत म्हणाले". मंत्री रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, दाजी साळकर, बोर्ड चेअमन भगीरथ शेट्ये आदिमान्यवर उपस्थित होते.

10 हजार स्क्वोअर मीटरची ही भव्य वस्तू असून बोर्ड स्थापन झाल्यापासून आजपर्यंत नेमणूक झालेल्या प्रत्येक चेअरमनने बोर्डाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले आहे.

तसेच वेगवेगळे अभ्यासक्रम समाविष्ट पुढच्या वर्षी बोर्डाला 50 वर्ष पूर्ण होत असून त्याअगोदरच बोर्डाची नूतन वस्तू उभारण्याचे काम होतंय हि अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचेही सावंत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

CM Pramod Sawant
Goa Panchayat Construction
BVSc and AH Degree Course Goa
Goa 11th Admission
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com