CM Pramod Sawant: महागाई वाढल्‍यास सरकार अर्थसाहाय्यही वाढवणार : मुख्यमंत्री

CM Pramod Sawant: तीन लाख लोकांना योजनांचा आधार
 'Griha Aadhar Scheme'
'Griha Aadhar Scheme'Dainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant: ‘गृहआधार’सारख्‍या योजना सुरू करण्‍यामागे कमकुवत घटकांचा उत्‍कर्ष हा हेतू असून यापुढे सर्व अर्थसाहाय्य योजना बाजारभावाशी जोडण्‍याचा सरकारचा इरादा आहे, अशी घाेषणा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

त्‍यामुळे महागाई वाढल्‍यास या याेजनांद्वारे मिळणारी अर्थसाहाय्याची रक्‍कमही वाढवण्यात येईल. त्‍याचा फायदा गोव्‍यातील कमकुवत घटकांना होईल, असेही ते म्‍हणाले.

मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये नवीन ११ हजार लाभार्थ्यांना गृहआधार योजनेची मंजुरीपत्रे वाटण्‍याचा कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते.

 'Griha Aadhar Scheme'
बेरोजगारी, व्यवसायात फटका! गोव्यात तरुण मद्य, अमली पदार्थांच्या आहारी; चारवर्षातील आकडेवारी चिंताजनक

यावेळी महिला व बालकल्‍याण खात्‍याचे मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, समाजातील शेवटच्‍या घटकांपर्यंत मदत, हेच तत्त्व डोळ्‍यांसमोर ठेवून सरकार योजना राबवत असून त्‍याचा फायदा सर्वांना व्‍हावा, अशी आमची अपेक्षा आहे.

यावेळी समाजकल्‍याण मंत्री सुभाष फळदेसाई, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार दिगंबर कामत, उल्‍हास तुयेकर, आलेक्‍स सिक्‍वेरा, आलेक्‍स रेजिनाल्‍ड लॉरेन्‍स आणि मान्यवर उपस्‍थित हाेते.

 'Griha Aadhar Scheme'
Margao News: मासळी विक्रेत्यांवर पोलिस बळाचा वापर; मडगावात तणाव

देशातील एकमेव राज्य

आतापर्यंत गोव्‍यात ‘गृहआधार’ची मदत मिळणाऱ्या महिलांची संख्‍या दीड लाख असून, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली पेन्‍शन घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्‍याही जवळपास तेवढीच आहे.

गोव्‍याची लोकसंख्या १५ लाख असून त्‍यापैकी तीन लाख लोकांना सामाजिक सुरक्षा योजनांतून अर्थसाहाय्य दिले जाते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात मदत देणारे गोवा हे देशातील एकमेव राज्‍य असल्‍याचे मुख्‍यमंत्री सावंत यांनी सांगितले.

300 कोटींची तरतूद

गणेश चतुर्थी चार दिवसांवर येऊन ठेपली असून सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांना उद्यापर्यंत अर्थसाहाय्य देण्‍यात येणार आहे. त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सावंत यांनी दिली.

मडगावातील कार्यक्रमाला सुमारे तीन हजार महिला उपस्‍थित होत्या. यावेळी लाभार्थ्यांना मुख्‍यमंत्र्यांच्‍या हस्‍ते गृहआधार योजनेची मंजुरीपत्रे देण्‍यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com