बेरोजगारी, व्यवसायात फटका! गोव्यात तरुण मद्य, अमली पदार्थांच्या आहारी; चारवर्षातील आकडेवारी चिंताजनक

गोव्यात 2018 पासून 6,592 जण मद्य आणि अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.
Addiction Data Of Four years in Goa
Addiction Data Of Four years in GoaDainik Gomantak

गोव्यातील तरुणांचे मद्य आणि अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण अधिक असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

मागील चार वर्षात 6,592 जण या व्यसनांच्या आहारी गेले असून, याला बेरोजगारी, व्यवसायात फटका, नातेसंबधातील क्लेष आणि कोरोना महामारी अशा कारणांचा समावेश आहे. आरटीआयमधून ही माहिती समोर आलीय.

माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार, 2018 पासून 6,592 जण मद्य आणि अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत. व्यसनातून बाहेर पडण्यासाठी या लोकांनी दोन्ही जिल्हा रुग्णालय आणि पुनर्वसन केंद्रात उपचार सुरु केले आहेत.

समोर आलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत १२४ रुग्णांनी अमली पदार्थाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी उपचार घेतले. यात सध्या २४ रुग्णांचा समावेश असून, गेल्या वर्षी ३५ रुग्ण उपचार घेत होते.

तसेच, २०१८ मध्ये ८५९ दारुच्या व्यसानात गुरफटलेल्या जणांनी त्यातून बाहेर पडण्यासाठी उपचारांची मदत घेतली.

दरम्यान, गोव्यात वाढत्या मद्य, धुम्रपान आणि अमली पदार्थांचे व्यसन अनेकांचे आयुष्य बरबाद करत आहे. यात तरुणांचा आकडा चिंताजनक असून, तरुणांमध्ये मद्य आणि धुम्रपान व्यसनाचे प्रमाण अधिक आहे.

तरुणांमध्ये अमली पदार्थ व्यसनाच्या वाढत्या प्रमाणाबाबत डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे.

राज्यात सहज पद्धतीने उपलब्ध होणारे अमली पदार्थ डोकेदुखी ठरत आहे, सर्वपक्षीय आमदारांनी वारंवार याबाबत चिंता व्यक्त केली असली तरी, याचा समूळ नाश आवश्यक असल्याची गरज डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com