Unemployment in Goa : गोव्यात फक्त 20 हजार बेरोजगार? मुख्यमंत्र्यांच्या दाव्यात किती तथ्य?

निती आयोगाची माहिती चुकीची असल्याचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा दावा
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Unemployment in Goa : निती आयोगाने जाहीर केलेली माहिती चुकीची असून गोव्यात फक्त 20 हजार बेरोजगार असल्याचा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे. निती आयोगाने तब्बल 1 लाख 10 हजार तरुण गोव्यात बेरोजगार असल्याचा अहवाल जाहीर केला होता. ही माहिती जुनी असून बहुतांश जणांना नोकऱ्या मिळाल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.

निती आयोगाच्या आकडेवारीनुसार गोव्यातील तब्बल 1 लाख 10 हजार तरुण बेरोजगार आहेत. मात्र यापैकी 80 हजार जणांना नोकरी मिळाली आहे. नोकरी मिळाल्यानंतर या तरुणांनी आपलं नाव एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधून कमी केलेलं नाही, कारण त्यांना सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षा आहे. तसंच काही सरकारी अधिकाऱ्यांची नावंही या यादीतून अद्याप वगळली नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा आकडा लाखाच्या घरात गेला असून तो चुकीचा असल्याचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे.

सरकारी आकडेवारीनुसार फक्त 20 हजार तरुणच गोव्यात बेरोजगार आहेत. तसंच गोवा सरकार नोकरी मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीचं नाव एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधील यादीतून जावं यासाठी काम करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

CM Pramod Sawant
Air Marshal from Goa : एअर मार्शल झालेले दोन मूळचे गोमंतकीय

दरम्यान सरकारच्या रोजगार आणि कामगार आयुक्तालयाने गाजावाजा करून आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यासाठी तब्बल 21 हजार युवक-युवतींनी नोंदणी केली होती. पण त्यापैकी 50 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 10 हजार जणांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. प्रामुख्याने ‘टार्गेट ओरिएंटेड’ कंत्राटी पद्धतीच्या मार्केटिंग-सेल्समध्ये संधी असल्याने केवळ 500 जणांना नियुक्तीपत्रे मिळाली. तर 4800 जणांना शॉर्टलिस्टेड केले असून ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

रोजगार आणि कामगार आयुक्त राजू गावस म्हणाले, मेळाव्याला राज्यभरातील 155 कंपन्यांनी पूर्वनोंदणी केली होती. त्यानंतर 15 कंपन्या प्रत्यक्ष आयोजनस्थळी सहभागी झाल्या. त्यामुळे हा आकडा 170 वर गेला. या अगोदर आम्ही 4 हजार नोकऱ्या जाहीर केल्या होत्या. त्यात भर पडत 5500 हून अधिक नोकऱ्या उपलब्ध असल्याचे कंपन्यांनी सांगितले होते. त्यानुसार 4800 लोकांना शॉर्टलिस्टेड करण्यात आले आहे. ही त्यांची पहिली मुलाखत वजा चाचणी झाली. त्यांची कंपनी व प्रादेशिक कार्यालयात अंतिम परीक्षा होईल. सध्या मेळाव्यातील दोघेजण कामावर रुजुही झालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com