CM Pramod Sawant: गोव्यात व देशात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या चौफेर विकासाच्या जोरावर देशात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय अटळ आहे. कारण सत्तेवर आल्यानंतर या सरकारने लोकांना विकासाचा निकाल दाखविला आहे.
मागील सरकार हे "स्केम मास्टर" होते, तर आमचे सरकार "सक्सेस स्टोरी" लिहीणारे सरकार आहे. मागील सरकारचे कार्य व आताच्या सरकारचे कार्य याची तुलना केल्यास गेल्या दहा वर्षांत आमचा देश व राज्य किती उंचीवर पोहोचले आहे याचा अंदाज येईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केले.
डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने आज राज्याचा चौफेर विकास झालेला आहे. गेल्या 12 वर्षांपूर्वीचा गोवा डोळ्यासमोर आणून विचार करा. गोव्याची परिस्थिती काय होती.
आणि आजच्या गोव्याची परिस्थिती पहा. कितीतरी बदल दिसून येत आहे. तरीही काहीजण सरकारवर टिका करतात कि या सरकारने काहीच केलेले नाही. त्यांनी आपली दृष्टी तपासून घ्यावी, अन्यथा आपल्यापेक्षा जेष्ठ नागरिकांना विचारावे.
काहिंना निवडणूक जवळ आल्यावर टिका करण्याचा जणू आजारच जडलेला असतो. परंतू या सरकारच्या कार्यापुढे कोणाच्याही टिकेचा प्रभाव पडणार नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले.
पाळी मतदारसंघातील विविध पंचायत क्षेत्रात जिल्हा पंचायत निधीतून जि. पं. सदस्य गोपाळ सुर्लकर यांच्या नेतृत्वाखाली हाती घेण्यात आलेल्या विविध कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.