CM Pramod Sawant: कुत्र्यापेक्षा गायी पाळा! घरी गायी पाळण्यासाठी सरकार आर्थिक बळ देणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Vishwa Hindu Parishad: गोव्यात समान नागरी कायद्याचे चांगल्याप्रकारे पालन, देशात निधर्मी नागरी कायदा लागू व्हावा ही मागणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
 Vishwa Hindu Parishad: गोव्यात समान नागरी कायद्याचे चांगल्याप्रकारे पालन, देशात निधर्मी नागरी कायदा लागू व्हावा ही मागणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: गायी घरी पाळण्यासाठी सरकार आर्थिक बळ देणार आहे. एका घरात किमान पाच देशी गायी असल्यास त्या घराला दरदिवशी सरकार प्रत्येक गायीप्रमाणे रू. ८० देणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केली.

या योजनेची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे. घरात आता एखादा प्राणी पाळायचाच असल्यास कुत्र्यापेक्षा गायी पाळा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिला.

विश्व हिंदू परिषदेला ६० वर्षे होत असल्याने विश्व हिंदू संमेलनाचे आयोजन साखळीतील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थानच्या सभागृहात करण्यात आले आहे. या संमेलनात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे विभाग प्रमुख संजय नाईक, साखळीचे प्रमुख संतोष भगत, साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, भानुदास जोशी, राधाकृष्ण मुरलीधर संस्थानचे अध्यक्ष राजदत्त मापारी व इतरांची उपस्थिती होती.

 Vishwa Hindu Parishad: गोव्यात समान नागरी कायद्याचे चांगल्याप्रकारे पालन, देशात निधर्मी नागरी कायदा लागू व्हावा ही मागणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
Cow Urine Unfit for Humans: गोमूत्र मानवांसाठी सुरक्षित नाही, संशोधनात धक्कादायक खुलासा

ते कळणारही नाही!

हिंदू कधी अल्पसंख्याक होईल हे कळणारही नाही, म्हणून विश्व हिंदू परिषदेचे काम करावे. देशात सर्वधर्मीयांचे काम सुरू आहे. ते करण्याची मुभाही येथे आहे. त्याचा कधी द्वेष होत नाही. सर्वांना स्वातंत्र्य आहे. गोव्यात समान नागरी कायद्याचे चांगल्याप्रकारे पालन होत आहे. आज देशात निधर्मी नागरी कायदा लागू व्हावा ही मागणी आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

पाच गायीप्रमाणे दरदिवशी रु. ४००/- व महिन्याला एकूण १२ हजार रुपये एका घराला मिळतील. त्याचबरोबर गायीपासून मिळणारे शेण, गोमूत्र याचा वापर पुन्हा सेंद्रिय शेतीसाठी होऊ शकतो. त्यासाठीही सरकार सवलत देत आहे. याचा लाभ घेत आता गोव्यातील लोकांनी केवळ गावठी देशी गायी पाळण्यासाठी पुढे यावे.

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com