पणजी: कॅनडातील हिंदू मंदिरावर झालेल्या हल्याचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी निषेध केला आहे. मंदिरावरील हल्ला शांततेची मूल्ये, आदर आणि एकतेवर हल्ला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कॅनडा सरकारने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
खालिस्तानी समर्थक आणि हिंदू नागरिकांमध्ये कॅनडातील ब्रॅम्पटन सिटी येथे झटापटी झाली. हिंदू समुदायाच्या वतीने हिंदू सभा मंदिरात आयोजित कार्यक्रमावेळी ही घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबध ताणले आहेत. खालिस्तानी समर्थकांना उत्तर अमेरिकेतून पाठिंबा मिळत असल्याचा आरोप होत आहे. तसेच, भारताने दहशदवादी म्हणून जाहीर केलेल्या हरदीप सिंग निज्जर यांची हत्या केल्याचा आरोप कॅनडाने केला आहे. यामुळे उभय देशातील संबध तणापूर्व झाले आहेत.
यानंतर कॅनडात घडलेल्या घटनेमुळे देशातून विविध नेते आणि मंत्री प्रतिक्रिया देत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या प्रकरणी प्रतिक्रिया देत घटनेचा निषेध केला.
कॅनडातील हिंदू मंदिरावर आणि तेथील भक्तांवर झालेला हल्ला पूर्णपणे अमान्य असून घटना चिंताजनक आहे. कोणत्याही प्रगत समाजाचा पाया असणारी शांततेची मूल्ये, आदर आणि एकतेवर हा हल्ला आहे. कॅनडा सरकारने त्यांच्या सीमेतील सर्वधर्मीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग उपाययोजना करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी केलेल्या ट्विटला रिट्विट केले आहे. नरेंद्र मोदींनी देखील कॅनडात झालेल्या हल्ल्याचा निषेध करत कॅनडा सरकारने याप्रकरणी योग्य कारवाई करण्याची मागणी मोदींनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.