Goa Climate Change: 'या' शहराचं तापमान दोन अंशांनी कमी झालं, पण कसं? गोव्यात असा प्रकल्प राबवणं शक्य आहे का?

Goa Weather Necessary Changes: हवामानात बदल घडवून आणणे ही सामान्य माणसाला जमणारी गोष्ट आहे का? नाही!! पण काही अशा उपाययोजना नक्कीच सुरु करू शकतो ज्यामुळे काहीसा बदल नक्कीच घडून येतील...
Goa Weather Necessary Changes: हवामानात बदल घडवून आणणे ही सामान्य माणसाला जमणारी गोष्ट आहे का? नाही!! पण काही अशा उपाययोजना नक्कीच सुरु करू शकतो ज्यामुळे काहीसा बदल नक्कीच घडून येतील...
Goa Climate ChangeDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Climate Precautionary Changes

पणजी : अझरबैजानची राजधानी बाकू येथे COP 29 ही हवामान बदलासंदर्भातील परिषद सुरू असतानाच नोव्हेंबरमध्ये गोव्यातलं वातावरणही बदललं आहे. गोव्यात उकाडा वाढला असून नोव्हेंबरमध्ये दरवर्षी सकाळी आणि रात्री वातावरण थंड असते, मात्र यंदा हे चित्र बदललं आहे.

हिवाळ्यात देखील उकाडा सोसणारं गोवा हे एकमेव ठिकाण नाही आणि हवामान बदलाचे होणारे दुष्परिणाम हा मुद्दा आता तसा नवीन राहिलेला नही. सध्या COP 29 ही हवामान बदल परिषद अझरबैजान येथे सुरू आहे आणि या परिषदेत जगभरातील देशांचे प्रतिनिधी हवामान बदल आटोक्यात आणायच्या उपायांवर चर्चा करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमधील वृत्तानुसार, COP 29 मध्ये हवामान बदलामुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल देशांना मदत करण्याबाबत अंतिम निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकीकडे हजारो अब्ज डॉलर्सच्या मदतनिधीबाबत बैठकांचं सत्र सुरू असतानाच हवामानात बदल घडवून आणणे ही सामान्य माणसाला जमणारी गोष्ट आहे का? आपण कसं काय वातावरण बदलू शकतो? नक्कीच नाही!! पण काही अशा उपाययोजना नक्कीच सुरु करू शकतो ज्यामुळे काहीसा बदल नक्कीच घडून येतील...

कोलंबियातील मेडेलिन या शहराने अवलंब केलेल्या काही गोष्टी आपण देईल अजमावून बघू शकतो. झाडं लावल्याने तापमान कमी व्हायला मदत होते असं ऐकलं असेल ना तुम्ही? हेच आपल्याला गोव्यात सुद्धा करायचं आहे. मेडेलिनमधल्या रहिवाशांनी वाढत्या तापमानावर मात करण्यासाठी हेच केल्याचं ‘बीबीसी’ने 2023 मध्ये मेडेलिनमधील ग्रीन कॉरिडॉरबाबत वृत्त दिलं होतं.

मेडेलिनमधील ग्रीन कॉरिडोर प्रकल्प काय आहे?

मेडेलिनमध्ये 30 वर्षांपासून फळ विकणाऱ्या कॅस्ट्रोने बीबीसीला सांगितले की, साधारण दशकभरापूर्वी मेडेलिनमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली.

Goa Weather Necessary Changes: हवामानात बदल घडवून आणणे ही सामान्य माणसाला जमणारी गोष्ट आहे का? नाही!! पण काही अशा उपाययोजना नक्कीच सुरु करू शकतो ज्यामुळे काहीसा बदल नक्कीच घडून येतील...
Goa Weather: गोव्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शुक्रवारी यलो अलर्ट

स्थानिक प्रशासनाने रस्ते रुंदीकरण आणि अन्य विकासकामांसाठी झाडांची कत्तल केली आणि याचा परिणाम म्हणजे शहरात उष्णता आणि प्रदूषण दोन्हीचे प्रमाण वाढले. शेवटी मेडेलिनमध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. यासाठी 13 मिलियन डॉलर्सचा आराखडा करण्यात आला. 2016 मध्ये या प्रकल्पाची सुरूवात झाली.

हा खर्च काही लोकांना अवास्तव वाटू शकतो पण त्याचे परिणाम म्हणजे मेडेलिनचे तापमान दोन अंशांनी खाली आले आणि वायू प्रदूषणाचे प्रमाणही आटोक्यात आले. हा प्रकल्प म्हणजे ग्रीन कॉरिडोर. 2022 मध्ये या प्रकल्पाच्या देखभालीचा खर्च भारतीय चलनानुसार 5 कोटी रुपये ऐवढा होता.

सुरुवातीला या प्रकल्पांतर्गत 1,20,000 रोपं आणि 12,500 झाडं लावली होती. शहरातील बाग, रस्त्यालगत ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात आली. 2021 पर्यंत मेडेलिनमध्ये 2.5 दशलक्ष आणखी लहान रोपं लावण्यात आली. याचा परिणाम म्हणजे मेडेलिनच्या रस्त्यांलगत फळ झाडं आहेत ज्यांच्या सावलीतून तुम्ही प्रवास करता. या प्रकल्पाला पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं. आजच्या घडीला या शहरामध्ये 30 पेक्षा जास्त ग्रीन कॉरिडॉर उभे आहेत. या प्रकल्पाला 2019 मध्ये ‘कूलिंग बाय नेचर’ श्रेणीतील ॲशडेन पुरस्कार मिळवला होता.

गोव्यात असा प्रकल्प शक्य आहे का?

आज गोव्यात मोठमोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरूये. मेडेलिनमध्येही असंच झालं होतं आणि वातावरणातील बदलांनी नंतर स्थानिकांचं जगणं कठीण झाले होते. कोलंबियाकडून आपण काय घडा घ्यायचा?

फक्त झाडं लावल्याने वातावरण बदलणार नाही, झाडांची कत्तल कशी नियंत्रणात आणता येईल याचाही विचार केला पाहिजे. स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांतर्गत सध्या पणजीत अशाच प्रकारे काही झाडं लावली जातायेत, यामुळे वातावरणात कितपत बदल होईल सांगता येणं कठीण आहे मात्र पणजीच्या वातावरणात बदल होणार असेल तर आपण गोव्यातील बाकी ठिकाणी हाच प्रयत्न करून बघितला तर मेडेलिनसारखी गोव्यातील हिरवागार निसर्ग कायम राहण्यास मदत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com