Goa Class 12 Results 2021: असा पाहू शकता तुम्ही १२ वीचा निकाल

गोवा (Goa) राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (Class 12 results) सोमवारी (आज) जाहीर होणार आहे
Class 12 results in Goa will be declared on Monday
Class 12 results in Goa will be declared on MondayTwitter
Published on
Updated on

पणजी: गोवा (Goa) राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल (Class 12 results) सोमवारी (आज) जाहीर होणार आहे. गोवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे (GBSHSE) अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना (COVID-19) संकटामुळे यंदा दहावीच्या व बारावीच्या अंतिम परीक्षा घेण्यात आल्या नाहीत, त्या रद्द करण्यात आल्या होत्या.

(Goa Class 12 Results 2021: How to check HSC marksheet online)

विद्यार्थ्यांना मूल्यांकन, यापूर्वी झालेल्या चाचणी परीक्षांच्या गुणांच्या आधारे आणि खास स्थापन केलेल्या निकाल समित्यांच्या अहवालानुसार गुण देऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ५ वाजता पर्वरी येथे निकाल जाहीर झाल्यानंतर गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (जीबीएसएचई) वेबसाईटवर ५.३० वाजल्यापासून निकाल पाहता येईल.

Class 12 results in Goa will be declared on Monday
COVID-19 Goa: संचारबंदी २६ जुलैपर्यंत वाढवली; काय राहणार चालू, काय बंद

बारावी परीक्षांची मूल्यांकन पद्धत

गोवा बोर्ड ऑफ सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन(Goa Board of Secondary and Higher Secondary Education) ने बारावी परीक्षांची मूल्यांकन पद्धत मागच्या महिन्यात जाहीर केली होती. बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन दहावी, अकरावी आणि बारावी अंतर्गत परीक्षांच्या (Internal Exams) आधारे केले जाईल. बारावीचा रिझल्ट हा दहावी, अकरावीच्या अंकाचे वेटेज ३०-३० टक्के असेल तसेच बारावीच्या गुणांचे वेटेज ४० टक्के राहील.

यामध्ये दहावीमध्ये सर्वात जास्त गुण मिळवणाऱ्या ३ विषयांची सरासरी असेल. अकरावीमध्ये पेपरचे अंतिम गुण दिले जातील. तसेच बारावीमधील यूनिट टेस्ट, एफटी, मिड टर्म आधारे गुण मिळतील. १२ वी निकालाच्या माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पाहू शकता:

https://www.gbshse.info/

असा पाहू शकता १२ वीचा निकाल

- https://www.gbshse.info/ या संकेतस्थळावर १२वी चा निकाल तुम्ही पाहू शकता

- HSSC Result 2021 वर क्लिक करा

- विद्यार्थांना त्यांचा आसन क्रमांक (Seat Number), जन्मतारीख, शाळेचा अनुक्रमांक आणि त्यांचं टाकावं लागेल.

- Get Result वर क्लिक करून तुम्ही तुमचा निकाल बघु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com