Goa: गत वर्षाच्या तुलनेत यंदा ई - वाहन नोंदणी चार पटीने वाढली आहे. 2022 मध्ये 27 डिसेंबरपर्यंत 5 हजार 579 वाहनांची नोंदणी झाली आहे. यात मोठ्या संख्येत दुचाकांची समावेश आहे. तसेच चार चाकी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 2023मध्ये ई-वाहन नोंदणीला आणखी वेग येणार आहे, कारण गोमंतकीयांचा कल ई - वाहनांकडे वळला आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
2021 एक हजार 95 ई - वाहनांची नोंदणी झाली होती. राज्यात ई - वाहनांचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने गोवा सरकारने अनुदान निधी योजना सुरू केली होती. परंतु या वर्षी ऑगस्ट पासून ही योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर ई - वाहन खरेदीवर परिणाम होणार असल्याची भीती व्यावसायिकांच्या मनात होती.
मात्र भीती खोटी ठरली असून गोमंतकीयांना ई - वाहन खरेदीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. अनुदान योजना बंद झाल्यानंतर एक दोन महिने थोडा परिणाम झाला होता. पण त्यानंतर ई - वाहन नोंदणीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे, असल्याची आकडेवारी केंद्राच्या वाहन संकेतस्थळावर आहे.
तज्ज्ञांचे मत
2023 ई - वाहनांची संख्या आणखी वाढणार आहे, कारण आता ही सामान्य गोष्ट झाली आहे. सुरवातीला ग्राहकांच्या मनात शंका होत्या त्या दूर झाल्या आहेत. त्यामुळे अनुदान बंद होऊनही जास्त परिणाम झालेला नाही. उलट मागणी वाढत आहे. ई - वाहन हे आपले भविष्य आहे. - करणजीव सिंग, मालक, एथर शोरूम, गोवा
ई -वाहनांसाठी अनुदान योजना राज्य सरकारने थांबवल्यानंतर ई - वाहन खरेदीवर परिणाम होईल,अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु तसे न होता, उलट चार चाकी आणि दुचाकींची मागणी वाढली. आमच्याकडे ‘हॅचबॅक’साठी बुकिंग वाढले आहे. - व्यंकटेश मराठे, विक्री व्यवस्थापक, दुर्गा मोटर्स
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.