Goa Christmas: सूर्य मावळल्यानंतर गावातील कोपऱ्या कोपऱ्यांवर सजवलेले 'क्रिब्स' पाहण्यासाठी गर्दी उसळते; गोव्यातील 'नाताळ'

Christmas celebration in Goa: जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात हा ऋतू अनोख्या परंपरांनी साजरा केला जातो. गोव्यातही ख्रिसमस साजरा करण्याच्या आपल्या अशा परंपरा आहेत.
Goa Christmas traditions, Goa Christmas food, Christmas celebration in Goa
Goa Christmas traditions, Goa Christmas food, Christmas celebration in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

जरी ख्रिश्चन धर्मिय बांधवांचा असला तरी नाताळ हा खरोखरच वर्षातील सर्वोत्तम काळ असतो. हवेत गारवा असतो, रस्त्यावर नक्षत्रे चमकत असतात, घरांमध्ये चॉकलेटचा सुगंध दरवळत असतो, परदेशातील कुटुंब सदस्य घरी परतलेला असतो. आनंद आणि हास्याची वेळही परतून आलेली असते. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात हा ऋतू अनोख्या परंपरांनी साजरा केला जातो. गोव्यातही ख्रिसमस साजरा करण्याच्या आपल्या अशा परंपरा आहेत. 

आपले डायट प्लॅन बाजूला सारून गोड स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घ्यायची ही वेळ असते. नारळाच्या गुळापासून बनवलेला गडद रंगांचा दोदोल, डीप फ्राय केलेल्या नेवऱ्या, मऊ-ओलसर डोस, सात स्तरांचे बेबिंका, तोंडात विरघळणारे बोलीन्हास हे ख्रिसमस साजरा होताना ताटात हजर असणारे आवश्यक पदार्थ आहेत.

राज्यातील काही प्रसिद्ध बेकरींमध्ये हे पारंपरिक पदार्थ या दिवसात काचेआडून नखऱ्यात डोकावत असतात. बेकरीच्या बाजूने जाताना या पदार्थांचा आकर्षक सुगंध आपल्याला चुकवता येणार नाही. अन्न हे केवळ पोटाशी संबंधित असलेली बाब नाही तर ते एखाद्या संस्कृतीशी परिचित होण्याचे प्रवेशद्वार आहे. 

Goa Christmas traditions, Goa Christmas food, Christmas celebration in Goa
Oldest Christmas Tree: 1441 मध्ये उभारलेला युरोपातील पहिला 'ख्रिसमस ट्री', एस्टोनियाची राजधानी, टॅलिनमधील खास नाताळ

गोव्यातील ख्रिश्चन बांधवांच्या पाककृतीच्या खजिन याबद्दल जाणून घेण्यासाठी ख्रिसमस हा सर्वोत्तम काळ असतो. पुलाव, रोस्ट, सोर्पातेल, भरलेले चिकन किंवा टर्की, बीफ रौलेड हे त्यांच्या घरातील स्वयंपाक घरात स्वादिष्टपणे शिजतातच पण त्याचबरोबर अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये हे चविष्ट पदार्थ समाविष्ट असलेल्या मेजवानीचे आयोजन केले गेलेले असते. 

बाजारात तर आता गर्दीचा हंगाम चालू आहे. डोक्यावर लटकणारी रंगीबेरंगी नक्षत्रे, ख्रिसमस ट्री, चमकदार दिवे आणि अनेक सजावटीच्या वस्तूंनी भरलेली दुकाने ग्राहकांना आपले खिसे रिकामे करण्यास प्रवृत्त करताना दिसतात.

Goa Christmas traditions, Goa Christmas food, Christmas celebration in Goa
Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

ख्रिसमसच्या दिवसात सूर्य मावळल्यानंतर गावातील कोपऱ्या कोपऱ्यांवर सजवलेले क्रिब्स (ख्रिस्त जन्माचा देखावा) पाहण्यासाठी गर्दी उसळते. हे देखावे म्हणजे स्थानिक सर्जनशीलतेचे अद्भुत प्रदर्शन असते. 

ख्रिसमसच्या मध्यरात्रीच्या प्रार्थना विधीनंतर राज्यात अनेक दिवस नाताळ साजरा होत राहतो. राज्यभरात अनेक ठिकाणी नाचगाणी नृत्य आणि नाताळाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले गेलेले असते, जिथे पहाटेपर्यंत उत्साही लोक आपल्याला नाचताना दिसतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com