नाताळची लगबग सुरू! सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या, दर 10 टक्क्यांनी वाढले

Goa Christmas Market : राज्यात नाताळाची लगबग सुरू झाली असून सर्वत्र तयारी, खरेदी, रंगरंगोटी आदीची लगबग सुरू झाली आहे.
Goa Christmas 2025
Goa Christmas 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Christmas Preparations : राज्यात नाताळाची लगबग सुरू झाली असून सर्वत्र तयारी, खरेदी, रंगरंगोटी आदीची लगबग सुरू झाली आहे. नाताळासाठी लागणारे साहित्य बाजारात दाखल होऊ लागले आहे.

सजावटीचे सामान, विद्युत रोषणाईच्या माळा, ख्रिसमस ट्री, सांताचे मुखवटे, स्नोबॉल, टोप्या, तयार गोठे आणि रंगीबेरंगी नक्षत्रे, चांदण्या, गोठ्यात ठेवण्यासाठी लागणाऱ्या मूर्ती आदी सामान दाखल झाले आले आहे.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्याच्या दरांमध्ये १० टक्क्यानी वाढ झाली आहे. पणजी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावट साहित्य, फटाके खरेदीची दुकारने बाजार परिसरात थाटण्यात आली आहे.

Goa Christmas 2025
Goa Politics: सरकारविरोधी मतदार वगळण्यासाठी 'एसआयआर'चा वापर, एल्विस गोम्स यांची टीका

विविध दराची नक्षत्रे, गोठे, व इतर साहित्य येथून नागरिक आवर्जून खरेदी करून घेऊन जात आहेत.तसेच दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खरेदी करावीत यासाठी ख्रिसमस ऑफर देत आहेत. राज्यातील विविध ठिकाणच्या बाजारपेठा सध्या नाताळाच्या साहित्याने सजल्या असून ग्राहकांचीही बाजारात मोठी गर्दी होत आहे.

‘ख्रिसमस ट्री’ची खरेदी

बाजारात अनेक नागरिक साहित्य खरेदी करताना दिसतायेत. ख्रिस्ती बांधवांच्या घरी सणानिमित्त साफसफाई रंगरंगोटी आदीची कामे देखील पार पाडली जात आहे. ख्रिसमस ट्री, तयार गोठे, मिठाई व इतर साहित्य खरेदी अधिक प्रमाणात होत असल्याचे विक्रेते सांगतात.

Goa Christmas 2025
Goa Nightclub Fire: राज्यातील सर्व नाईट क्लबचे करणार 'ऑडिट', मंत्री दिगंबर कामत यांची माहिती

गोठा सजावटीचे काम जोरात

नाताळनिमित्त घरांसह कपेल, क्रॉसची रंगरंगोटी करण्याचे काम सुरू झाले आहे. तरूणाईने गोठा सजावटीच्या कामात गुंतली आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत भव्य देखावे, भव्य नक्षत्रे तयार केली जात आहेत. नाताळ सणासाठी लागणाऱ्या (नेवऱ्या) करंज्या, केक, बेबिंका व दोस व इतर गोडपदार्थ बनविण्याच्या तयारीसाठी लागणारे साहित्य देखील आता नागरिक खरेदी करत आहेत त्यासोबतच घरांमध्ये हे पद्धार्थ तयार करण्याची तयारी देखील सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com