'अशा' पद्धतीचं फेस्तचं निमंत्रण तुम्ही कधी पाहिलंय का? गोव्यात शेकडो वर्षांपासून सुरु आहे ही परंपरा

Jesus Christ Fest In Goa: गोव्यातील नास्नोडा आणि उसकई या गावातील फेस्टमध्ये असलेली प्रथा ख्रिस्ती गोवेकर पिढ्यानपिढ्या जपत आला आहे.
Jesus Christ Fest In Goa
Jesus Christ Fest In GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Jesus Christ Fest In Goa: गोवा हा विविध धर्मांचा मिलाफ असलेला भू भाग. इथल्या प्रत्येक गावाच्या प्रथा परंपरा वेगवेगळ्या असून आजच्या डिजिटलायझेशनच्या काळातही गोवेकर त्या आपुलकीने जपत आहे. गोव्यावर बराच काळ पोर्तुगीजांचे राज्य असल्याने गोव्याच्या सण-उत्सवांवर पोर्तुगीज संस्कृतीची झालर असलेली दिसते.

ओल्ड मॅन, कार्निवल, विविध प्रकारची फेस्ट ही त्याचीच काही अनोखी उदाहरणं. उत्तर गोव्यातील नास्नोडा आणि उसकई या गावातील फेस्टमध्ये असलेली प्रथा ख्रिस्ती गोवेकर पिढ्यानपिढ्या जपत आला आहे.

Jesus Christ Fest In Goa
Goa Accident: गोव्यात नववर्षाच्या प्रारंभीच अपघातात 4 जण ठार; स्मार्टसिटीच्या कामात एकाचा मृत्यू
Jesus Christ Fest In Goa:
Jesus Christ Fest In Goa:Dainik Gomantak

जानेवारीच्या 1 तारिखला नास्नोडा गावी जिजसचे फेस्ट असून त्या मागची रंजक कहाणी गोमंतकने जाणून घेण्यासाठी उसकई गावात भेट दिली. यावेळी या गावाच्या ट्रस्टचे अध्यक्ष- अल्फी पास्कोल डिसूझा यांनी फेस्टच्या निमंत्रण सोहळ्याच्या प्रथेबद्दल सविस्तर माहिती दिली.

यावेळी त्यांच्या सोबत खजिनदार- रेमंड सिक्वेरा, सचिव - मोझेस फर्नांडिस, सदस्य- डायगो कार्व्हालो आणि हेन्री लोबो उपस्थित होते.

अल्फी डिसूझा म्हणाले, फेस्टचे निमंत्रण देण्याची ही प्रथा कित्येक वर्ष सुरु असून या कार्यक्रमाची सुरुवात अशी होते की उसकई गावातील ख्रिस्ती बांधव एकत्र जमून गावाच्या वेशीकडे ठराविक ठिकाणी जमतात.

त्याचवेळी पलीकडच्या नास्नोडा गावाहून त्यांचे भाऊबंद उसकईच्या बांधवांना नास्नोडा येथे होणाऱ्या फेस्टचे आमंत्रण देण्यासाठी त्या जागी येतात. दोन्ही गावातील बांधवांच्या भेटी गाठी होऊन असा हा फेस्टच्या निमंत्रणाचा आदानप्रदान सोहळा चालतो.

Jesus Christ Fest In Goa:
Jesus Christ Fest In Goa:Dainik Gomantak

फेब्रुवारी महिन्यात जेव्हा उसकई गावातील फेस्ट असते तेव्हाही अशीच कृती घडत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही प्रथा कित्येक अनेक पिढ्यांपासून सुरु असून हे केवळ बार्देशमध्येच होत असल्याचे उसकई गावातील ख्रिस्ती बांधवांनी सांगितले.

यातून बंधुभाव वाढीस लागणे हाच मुख्य हेतू आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात या प्रथा परंपरा जपणं शक्य होत नाही.

तसेच नवीन पिढी याकडे पाठ फिरवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. युवा पिढीला या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी करून घेण्याचा प्रयत्न य निमित्ताने असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com