पणजी: राज्यातील महागाई काही केल्या कमी होण्याची होण्याची चिन्हे दिसत नाही. मध्यमवर्गीय तसेच गरीब कुटुंबीयांना तुटपुंज्या पगारात कुटुंबाचा गाढा ओढणे कठीण होत चालले आहे. पालेभाज्यांच्या दरात गेल्या दोन महिन्यांपासून काही बदल झालेला नाही. मिरची आणि लिंबू अजूनही चढ्या दराने विकले जात आहे.
वाढत्या उष्णतेमुळे फळांना देखील मागणी वाढलेली आहे. अनेकजण शहाळ्यांच्या ठेल्यावर जाऊन नारळ पाण्याचा आस्वाद घेऊन उष्णतेपासून गारवा मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पणजी मार्केटमध्ये मानकुराद, हापूस, सेंदुरी, केसरी, तोतापुरी असे विविध प्रकारचे आंबे विक्रीस उपलब्ध आहेत.
700 ते 2500 रुपये प्रतिडझन दराने ते विकले जात आहेत. आता मुबलक प्रमाणात आंबे यायला सुरूवात झाल्याने काही प्रमाणात आंब्यांच्या दरात घट झाल्याचे दिसून आले. गेल्या महिन्यात 3000 हजार रुपये डझन मानकुराद आंब्याचा दर होता. पण तो आता किंचित कमी झाला आहे.
दरम्यान, वाढत्या उन्हामुळे लिंबूची मागणी वाढली आहे. मात्र उत्पादनात तुटवडा आल्याने लिंबू 10 रूपयाला एक नग दराने विकला जातोय. गेल्या दोन महिन्यांपासून मिरचीचे दर देखील चढेच आहेत. आजही 120 रूपये प्रतिकिलो दराने मिरची विकली जात होती.
दर प्रतिकिलो
कांदा : 30
बटाटा : 30
टॉमेटो : 30
गवार : 50
कोबी : 40
भेंडी : 60
कारली : 60
मिरची : 120
पालेभाजी दर (जुडी)
मेथी : 20
लालभाजी : 20
पालक : 20
मुळा : 20
शेपू : 20
कोथंबीर : 20
लिंबू - 10 रु.
एक नग
कडधान्य दर प्रती किलो
मूग : 110
पांढरी चवळी: 115
शेंगदाणे : 140
हिरवे वाटाणे : 126
काबुली चणे : 115
साखर : 40
गूळ : 47
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.