पर्यावरण सांभाळणे हे आपले कर्तव्‍य: संकेत नाईक

खरपाल विद्यालयात सीडबॉल कार्यशाळा
Goa Protect Environment
Goa Protect Environment Dainik Gomantak
Published on
Updated on

साळ: पर्यावरण हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे व त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येकाने त्यास हातभार लावला पाहिजे. या कामात आपण खारीचा वाटा उचलावा. याचे प्राथमिक धडे म्हणून डिचोली तालुक्यातील लाटंबार्से पंचायत क्षेत्रातील खरपाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात सीडबॉल कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते. या कार्यशाळेसाठी जैवविविधता पुरस्कारप्राप्त, पर्यावरणप्रेमी व प्राथमिक शिक्षक संकेत नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.

झाडांची कत्तल व प्रदूषणामुळे नैसर्गिक ऑक्सिजनची खूप कमतरता भासत आहे. जंगले नष्ट होत चालली आहेत. या जंगलांचे जतन व्हावे यासाठी आपणही निसर्गाचे देणे लागतो ही जाणीव प्रत्येक मुलाच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी खरपाल सरकारी प्राथमिक विद्यालयाने सीडबॉल तयार करणे उपक्रम राबवण्याचे ठरवले.

जंगली झाडांना पाणी कमी लागते व त्यांची फार काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे सीडबॉल बनवण्यासाठी जंगली वनस्पतींच्‍या बियांचा उपयोग करावा असे आवाहन संकेत नाईक

Goa Protect Environment
अखेर मयेतील ‘रेड्या’ची जत्रा झालीच नाही!

यांनी केले. तसेच सीडबॉल बनवण्यासाठी चाळलेली माती, गांडूळ खत किंवा सुखे शेण तसेच चांगल्या सुकलेल्या बियांचा वापर करून सीडबॉल कसे बनवावेत याचे प्रात्यक्षिक त्‍यांनी दाखविले. विद्यार्थ्यांनीही उस्फूर्तपणे त्‍यात सहभाग दाखवून स्वतः हाताने हे सीडबॉल बनवले व हसत खेळत मजेत ही कार्यशाळा पार पडली.

सदर कार्यशाळेसाठी मुख्याध्यापिका प्रज्ञा दामले, शिक्षिका अर्चना राऊत, श्रद्धा पणसुलकर, शिक्षक गौरेश परवार, एसएमसी अध्यक्ष प्रतिमा गावस, पीटीए अध्यक्ष नीलेश गावस उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com