High Blood Pressure: चिंताजनक! लहान मुलांना उच्च रक्तदाब होण्याबाबतीत गोवा 6वा; 10-19 वयोगटातील 6.6% मुलांना आजाराची लागण

Children hypertension report: गोव्‍यासह देशभरात १९ वयापर्यंतच्‍या मुलांनाही उच्च रक्तदाब होण्‍याचा धोका वाढत चालला आहे. तर, अनेक मुले रक्तदाबाने ग्रस्‍तही आहेत.
Effects Of High Blood Pressure
High Blood PressureDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: १० ते १९ या वयोगटातील मुलांना उच्च रक्तदाबाचा आजार होण्‍याच्‍या बाबतीत गोव्‍याचा देशात सहावा क्रमांक लागतो. या वयोगटातील ३४४ मुलांमधील ६.६ टक्‍के मुले उच्च रक्तदाबाने ग्रस्‍त असतात, असे सांख्‍यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने नुकत्‍याच जारी केलेल्‍या ‘चिल्‍ड्रन इन इंडिया’ या अहवालातून उघड झाले आहे.

गोव्‍यासह देशभरात १९ वयापर्यंतच्‍या मुलांनाही उच्च रक्तदाब होण्‍याचा धोका वाढत चालला आहे. तर, अनेक मुले रक्तदाबाने ग्रस्‍तही आहेत. १० ते १९ वयोगटातील मुलांना उच्च रक्तदाब होण्‍याचे देशाचे प्रमाण सरासरी ४.९ टक्‍के इतके आहे.

परंतु, गोव्‍यासह दिल्ली, उत्तर प्रदेश, मणिपूर, छत्तीसगड, तेलंगण, गुजरात, बिहार, आमास, आंध्रप्रदेश, मध्‍यप्रदेश, मेघालय आणि ओडिशा या राज्‍यांमध्‍ये हे प्रमाण सरासरीपेक्षा अधिक असल्‍याचे अहवालातील आकडेवारीतून दिसून येते. यात दिल्ली प्रथमस्‍थानी असल्‍याचेही हा अहवाल सांगतो. दिल्लीतील वाढते प्रदुषणही आरोग्यावर परीणामकारक ठरत आहेत.

उच्च रक्तदाबाने ग्रस्‍त मुलांमधील

आघाडीची राज्‍ये (टक्‍केवारीत)

दिल्ली : १०.१

उत्तर प्रदेश : ८.६

मणिपूर : ८.३

छत्तीसगड : ७

तेलंगण : ६.७

गोवा : ६.६

रक्तदाब वाढण्याची मुख्य कारणे

लठ्ठपणा / जास्त वजन

कमी शारीरिक हालचाल

कौटुंबिक इतिहास

चयापचय समस्याः उच्च रक्त शर्करा

Effects Of High Blood Pressure
Blood Cancer: ब्लड कॅन्सर होण्यापूर्वी कोणती लक्षणे दिसतात? कोणत्या लोकांना जास्त धोका असतो? वेळीच सावध व्हा!

निदान न झाल्यास परिणाम

हृदयविकार

मूत्रपिंडाची समस्या

रक्तवाहिन्यांचे नुकसान

हृदयाची मांसपेशी जाड होणे

Effects Of High Blood Pressure
High BP च्या रुग्णांसाठी कॉफी अन् ग्रीन टी, दोन्हीमध्ये काय जास्त फायदेशीर ठरेल?

मेदयुक्त पदार्थ टाळा

अतिप्रक्रिया केलेल्या पदार्थांत भरपूर साखर-मीठ आणि मेदयुक्त पदार्थ असतात. त्यात पोषणमूल्यं आणि तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स कमी असतात. या पदार्थांमध्ये कॅलरी मात्र भरपूर असतात. त्यामुळे या सुचनांमध्ये एक महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे सर्वांनी, सॉस, चिज, मेयोनिज, जॅम, फ्रुट पल्प, ज्युस, कार्बनयुक्त पेयं, पाकिटबंद रस असे पदार्थ कमी खावेत. मुलांनी गोड, खारट, बेकरीतले पदार्थही टाळले पाहिजेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com