CM Pramod Sawant on H3N2 Virus : नव्या ‘एसओपी’चे पालन करा : मुख्यमंत्री

‘एच3एन2’ची भीती कायम :कोरोना बाधित संख्येत वाढ; नमुने आढळले पॉझिटिव्ह
CM Pramod Sawant on H3N2 Virus
CM Pramod Sawant on H3N2 VirusDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant on H3N2 Virus: देशभर थैमान घातलेल्या ‘एच3 एन2’ इन्फल्यूएन्झा विषाणूसह कोरोना बाधितांची संख्या राज्यात झपाट्याने वाढत चालली आहे.

यासाठी नागरिकांनी केंद्र आणि राज्य सरकारने तयार केलेल्या नव्या आदर्श कार्यप्रणालीचे (एसओपी) पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. आज कोरोनाच्या नव्या 24 बाधितांसह एकूण बाधितांचा आकडा 125 वर गेला.

आरोग्य खात्याचे साथ रोग विभागप्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी म्हणाले की, पुण्याच्या विषाणू प्रयोगशाळेला ‘एच3 एन2’च्या तपासणीसाठी पाठवलेले दोन्हीही नमुने पॉझिटिव्ह आल्याने राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे, हे स्पष्ट होते.

CM Pramod Sawant on H3N2 Virus
Gudi Padawa 2023: सगल्यांक पाडव्याचीं परबीं! मुख्यमंत्री सावंतासह दिग्गज नेत्यानी दिल्या मराठी नवर्षाच्या शुभेच्छा

यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने आवश्यक असलेल्या सतर्कतेच्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहे. राज्यात कोविड रुग्णांमध्ये वाढ होत असून आज नव्याने 24 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकूण बाधितांची संख्या 125 झाली आहे.

राज्यातील एकूण बाधित 125

राज्यात काल कोरोनाचे 24 नवे बाधित सापडले. त्यामुळे एकूण कोरोना बाधितांची संख्या 125 झाली आहे. काल घेतलेल्या 473 संशयितांच्या चाचण्यांपैकी 24 नवे बाधित सापडले.

काल कोरोनाचा बळी नसल्यामुळे एकूण मृत्यूंचा आकडा 4,013 वर कायम आहे. राज्यात आतापर्यंत 2,59,321 जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 2,55,183 रुग्ण पूर्णत: बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.40 टक्के आहे.

CM Pramod Sawant on H3N2 Virus
CM Pramod Sawant: पोलिस दल पुनर्रचना दृष्टिपथात : मुख्‍यमंत्री

राज्यात कोरोना बाधितांसह ‘एच3 एन2’ ची लक्षणे असणाऱ्या रुग्णांत वाढ होत आहे. यासाठीच सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले असून सर्व रुग्णालयांनाही तशा सूचना दिल्या आहेत. ही लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि औषधोपचार करावा.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com