मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, गोव्याच्या प्रश्नांवर चर्चा

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
Goa Chief Minister Pramod Sawant & Prime Minister Narendra Modi
Goa Chief Minister Pramod Sawant & Prime Minister Narendra ModiTwitter/ @ani_digital
Published on
Updated on

देशातील राजकारण मागील काही दिवसांपासून चांगलचं गाजत असतानातच दुसरीकडे, गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी गोव्यातील प्रश्नांवर चर्चा केली असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. तसेच त्यांनी किनारी राज्याच्या विकासासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शनही घेतले. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर त्यांचा हा दुसरा दिल्ली दौरा आहे.

Goa Chief Minister Pramod Sawant & Prime Minister Narendra Modi
मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची नारायण राणेंसोबत बैठक; गोव्यातील उद्योगांसंदर्भात विशेष चर्चा

"आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांची भेट घेतली. विविध मुद्द्यांवर चर्चा केली आणि गोव्याच्या विकासासाठी पंतप्रधानांकडून मार्गदर्शन मागितले," असे मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करुन सांगितले.

तसेच, गोव्यात भाजपचे (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) दिल्लीत भेट घेतली होती. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर प्रमोद सावंत यांनी गेल्या महिन्यात सलग दुसऱ्यांदा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, मणिपूर, गोवा आणि पंजाब या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता कायम आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत, 40 सदस्यीय राज्य विधानसभेत 20 जागा जिंकून भाजप गोव्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर काँग्रेस 11 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com